South Africa riots video: बाळाला वाचवण्यासाठी आईने धगधगत्या इमारतीतून बाहेर फेकले, व्हिडिओ झाला व्हायरल

South Africa riots video: दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन येथील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसते  की आईने पोटच्या मुलीला आगीपासून वाचवण्यासाठी कसे खाली फेकले.

mother throws baby from burning building south africa riots video gone viral
आगीतून वाचविण्यासाठी मुलीला फेकले इमारतीबाहेर 

थोडं पण कामाचं

  • दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन येथील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
  • या व्हिडिओमध्ये दिसते  की आईने पोटच्या मुलीला आगीपासून वाचवण्यासाठी कसे खाली फेकले.
  • खाली उभे असलेल्या जमावाने एकत्र येऊन त्या निरागस दोन वर्षांच्या मुलीला वाचवले.

डर्बन : सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये एका आईने आपल्या मुलीला वाचवण्यासाठी त्याच्या आगीने धगधगत्या इमारतीतून खाली फेकले. खाली उभे असलेल्या जमावाने एकत्र येऊन त्या निरागस दोन वर्षांच्या मुलीला वाचवले.

मागील आठवड्यात माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांना तुरूंगवास भोगावा लागला होता, तेव्हा दक्षिण आफ्रिकेतील हिंसाचार आणि दंगल उसळली होती. यात 72 लोक ठार आणि 1234 लोकांना अटक करण्यात आली होती. अनेक ठिकाणी जाळपोळ झाली आहे. अनेक ठिकाणी दुकानांची तोडफोड करण्यात आली, गोदामांना आग लावण्यात आली. 

डर्बनच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की बहुमजली इमारतीला आग लागली आहे. या पसरणाऱ्या आगीत इमारतीत असलेली  महिला ही जोरात ओरडत आहे. आई आपल्या मुलीबरोबर तिथे अडकलेली दिसत आहे. तिला काय करावे याची काही कल्पना नाही. अचानक ती तिच्या मुलीला खाली उभे असलेल्या लोकांकडे फेकते. हे सर्व तिला आणि तिच्या मुलीला वाचविण्यासाठी प्रयत्न करताना आणि ओरडताना दिसत आहेत. गर्दीतील लोकांनी एकत्र येऊन त्या मुलीला वाचवले.

बीबीसीशी बोलताना या महिलेने सांगितले की मी घाबरले होते, खरोखरच घाबरले होते, पण खाली रस्त्यावर लोक होते. लोक 'फेकून द्या, फेकून द्या' अशी ओरड करीत होते. जाळपोळ दरम्यान धूर होता म्हणून माझ्या लहान मुलीला माझ्यापासून दूर नेण्याचा मला कुणावर विश्वास नव्हता. या महिलेने रॉयटर्सला सांगितले की तिच्या मुलीला दुखापत झाली नाही आणि घटनेनंतर लवकरच आई आणि मुलगी पुन्हा एकत्र आले.

पण एका क्षणी आपल्या मुलीला फेकल्यावर ती घाबरली होती. आपण मुलीला फेकले पण खाली असलेल्या लोकांनी तिच्या मुलीला पकडले आहे की नाही, अशी भीती तिच्या मनात होती.  त्यांच्या मते, माझ्या मुलीसाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे परिस्थितीतून बाहेर पडणे होते. पुढे धोका होता. मला फक्त तिला वाचवायचे होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी