बंगळुरू : आईने आपल्या पोटच्या गोळ्याला पाचव्या मजल्यावरून फेकल्याची धक्कादायक घटना बंगळुरूमधून समोर आली आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ इतका धक्कादायक आहे की तो आम्ही तुम्हांला दाखवू शकत नाही.
अधिक वाचा : अहमदनगरमध्ये १११ फुटी तिरंगासह भव्य तिरंगा यात्रा
बंगळुरूमधील एस आर नगर येथील पाच मजली इमारतीत ही घटना घडली. टाइम्स नाऊ मराठीकडे असलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते आहे की, आई आणि तिचा पाच वर्षांचा मुलगा बाल्कनीत फिरताना दिसत आहेत. आईची मानसिक स्थिती खूप वाईट दिसत आहे. ती बाल्कनीत मुलासोबत फेऱ्या मारताना दिसत आहे. तीने मुलाला कडेवर उचलून घेतले. कोणी आपल्याला पाहत नाही ना याची खात्री केली. त्यानंतर तीने कोणालाही कळण्याच्या आत आपल्या बाळाला पाचव्या मजल्यावरून खाली फेकले. त्यानंतर स्वतः ग्रीलवर चढून जीव देण्याचा प्रयत्न केला.
अधिक वाचा : क्राईम शो पाहून 10 वर्षांच्या मुलाने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव
परंतु, त्याच वेळी शेजारचे आले आणि त्या महिलेला ग्रीलवरून खाली खेचले आणि तिला आत्महत्या करू दिली नाही. त्या मुलाचे काय झाले याबाबत माहिती मिळू शकली नाही. परंतु हा व्हिडिओ इतका धक्कादायक आहे की तो आम्ही तुम्हांला दाखवू शकत नाही.
अधिक वाचा : नाईट क्लबमध्ये मोठी दुर्घटना, १३ जणांचा होरपळून मृत्यू
महिलेने आपल्या पोटच्या मुलाला का फेकले आणि ती आत्महत्या का करत होती याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे. तसेच महिलेची चौकशी करून या कृत्याचे कारण पोलीस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.