Viral: महिलेचे १० तोळे सोने शोधण्यात मुंबई पोलिसांना आले अपयश; उंदराने असे दाखवले शोधून 

व्हायरल झालं जी
Updated Jun 17, 2022 | 12:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rat Finds Gold । या जगात अनेक विचित्र आणि आश्चर्यकारक गोष्टी घडत असतात. कधी अचानक कोणी गरीब होतो तर कधी कचऱ्यातून कोणाला काही मिळते, ज्यामुळे तो रातोरात श्रीमंत होतो.

mouse help Mumbai police in finding lost gold
मुंबई पोलिसांना आले अपयश, मग उंदराने शोधले १० तोळे सोने   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • या जगात अनेक विचित्र आणि आश्चर्यकारक गोष्टी घडत असतात.
  • मुंबई पोलिसांना आले अपयश, मग उंदराने शोधले १० तोळे सोने.
  • महिलेने वडापाव खाण्यासाठी दोन मुलांना सोने असल्याची पिशवी दिली.

Rat Finds Gold । मुंबई : या जगात अनेक विचित्र आणि आश्चर्यकारक गोष्टी घडत असतात. कधी अचानक कोणी गरीब होतो तर कधी कचऱ्यातून कोणाला काही मिळते, ज्यामुळे तो रातोरात श्रीमंत होतो. सध्या मुंबईतील एक अनोखी घटना लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. खर तर या घटनेत एका महिलेचे १० तोळे सोने चुकून कचऱ्यात गेले होते. यामुळे महिलेची अवस्था खूप वाईट झाली होती. यानंतर सोन्याचा शोध घेण्यासाठी त्यांनी मुंबई पोलिसांची मदत घेतली. (mouse help Mumbai police in finding lost gold). 

अधिक वाचा : फोटोत लपलेली मगर शोधताना अनेकांना फुटतोय घाम, पाहा फोटो

एका झटक्यात गेले १० तोळे सोने 

महिलेने घाम गाळून बनवलेले १० तोळे सोन्याचे दागिने कचऱ्यात कसे फेकले होते हे अद्याप स्पष्ट झाले नाही. १३ जून रोजी मुंबईतील दिंडोशी पूर्व मालाड भागात राहणाऱ्या एका महिलेने पोलिसांकडे मदत मागितली. सोने घेऊन बँकेत जमा करण्यासाठी घरातून बाहेर पडल्याचे महिलेने सांगितले. यादरम्यान तिची नजर वाटेत दोन भुकेल्या मुलांवर पडली. पिशवीत वडापाव असल्याचे महिलेने सांगितले, ज्यासाठी महिलेने ती पिशवी मुलांकडे दिली आणि ती बॅंकेकडे निघाली. 

महिलेने सांगितले की, थोडे अंतर पुढे गेल्यावर तिच्या पायाखालची जमीन सरकली, कारण ज्या पिशवीत तिने १० तोळे सोने ठेवले होते, ती बॅग तिच्याजवळ नसल्याचे तिला समजले. वडापावच्या पिशवीसोबतच तिने मुलांना सोने असल्याची बॅगही दिल्याचे महिलेने सांगितले. यानंतर ती पुन्हा त्याच ठिकाणी आली, मात्र तोपर्यंत दोन्ही मुले निघून गेली होती. तिथे सोने असल्याची पिशवी देखील नव्हती. यानंतर महिलेने तक्रार घेऊन पोलिस ठाण्यात धाव घेतली.

सोने शोधण्यात उंदराने अशी केली मदत

पोलिसांनी महिलेसह त्याच ठिकाणी येऊन सोने शोधण्यासाठी शोध सुरू केला, मात्र बराच वेळ पोलिसांना सोने सापडले नाही. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरा तपासला, ज्या माध्यमातून मुलांची ओळख पटली आणि त्यानंतर पोलिस त्यांच्याकडे चौकशीसाठी पोहोचले. दोन्ही मुलांनी पोलिसांना वडा पाव आवडत नाही म्हणून पिशवी कचऱ्याच्या डब्यात फेकल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी कचऱ्याच्या डब्याची झडती घेतली असता तेथे सोने आढळून आले नाही. यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा सीसीटीव्ही तपासले. यावेळी वडापाव खाण्यासाठी एक उंदीर पिशवी घेऊन नाल्याकडे जात असल्याचे पोलिसांना दिसले. यानंतर पोलिसांनी नाल्याकडे जाऊन तपासणी केली असता त्यांना सोने ज्यात होते ती पिशवी सापडली. आपल्या कष्टाचे सोने मिळाल्यानंतर महिलेने पोलिसांचे आभार मानले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी