धोनीचा संन्यासी लूक व्हायरल

MS Dhoni Appears Again in Monk-Like Avatar in New Star Sports Advertisement भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा नवा संन्यासी लूक व्हायरल

MS Dhoni Appears Again in Monk-Like Avatar in New Star Sports Advertisement
धोनीचा संन्यासी लूक व्हायरल 

थोडं पण कामाचं

  • धोनीचा संन्यासी लूक व्हायरल
  • धोनीच्या नव्या लूकवरुन असंख्य मीम्स व्हायरल
  • सोशल मीडियावर सध्या धोनीच्या नव्या लूकची जोरदार चर्चा

नवी दिल्ली: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा नवा संन्यासी लूक व्हायरल होत आहे. धोनीचा नवा लूक बघून चाहते भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी उत्सुकतेपोटी प्रश्न विचारले आहेत तर काहींनी नव्या लूकचे कौतुक केले आहे. (MS Dhoni Appears Again in Monk-Like Avatar in New Star Sports Advertisement)

धोनीने नवा संन्यासी लूक एका जाहिरातीसाठी घेतला आहे. या लूकमध्ये धोनीच्या डोक्यावर केस दिसत नाही. तो संन्याश्याच्या वेषात आहे. 'स्टार स्पोर्ट्स'ने धोनीच्या संन्यासी लूकमधील फोटो आणि व्हिडीओ प्रसिद्ध केले आहेत. चाहत्यांकडून धोनीच्या नव्या लूकचे स्वागत होत आहे.

याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले त्यावेळी धोनी केस वाढवत होता. झारखंडच्या आदिवासींप्रमाणे लांब केसांची हेअरस्टाइल त्याला आवडत होती. भारताने धोनीच्या नेतृत्वात क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली. धोनी लोकप्रिय झाला आणि त्याच्या हेअरस्टाइलची अनेक तरुण कॉपी करू लागले. धोनीने २०११चा वन डे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पहिल्यांदा डोक्यावरील सर्व केस काढून टाकले आणि टक्कल केले. 

भारत जिंकला तर केसांचा त्याग करेन असा नवस केला होता म्हणून धोनीने टक्कल करुन घेतले. पण त्याच्या या नव्या लूकचेही प्रचंड कौतुक झाले. यानंतर धोनीने पुन्हा लांब केसांची हेअरस्टाइल कधीच केली नाही. अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा धोनी टक्कल केलेल्या लूकमध्ये पुन्हा दिसला आहे. हे टक्कल खरंच केले आहे की मेकअपच्या मदतीने डोक्यावरील केस झाकले आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण प्रथमदर्शनी टक्कल केल्यासारखेच दिसत आहे. 

धोनीच्या नव्या लूकवरुन असंख्य मीम्स व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर सध्या धोनीच्या नव्या लूकची जोरदार चर्चा सुरू आहे.

धोनीचे आतापर्यंतचे लोकप्रिय लूक - 

धोनीची गोल्डन हेअर स्टाइल

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले (२००४) त्यावेळी धोनी लांब केस ठेवत होता. या केसांवर त्याने गोल्डन ट्रीटमेंट केली होती. यामुळे केस सोनेरी दिसत होते. भारत २००६ मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेला होतचा, त्यावेळी धोनीने चमकदार खेळ केला होता. पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी धोनीच्या हेअरस्टाइलचे कौतुक केले होते. 

स्ट्रेट हेअर

धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ मध्ये टी २० वर्ल्ड कप जिंकला. या विजयानंतर धोनीने हेअरस्टाइल बदलली. त्याने केसांना काळा रंग दिला आणि स्ट्रेट हेअर ठेवण्यास सुरुवात केली.

शॉर्ट हेअर

धोनी २००८ मध्ये पहिल्यांदा शॉर्ट हेअरमध्ये दिसला. कानाच्या बाजूला तर धोनीने केस अगदीच बारीक ट्रिम केले होते. नव्या लूकमध्ये धोनी हँडसम दिसत होता. यानंतर पुन्हा धोनीने स्पाइक लूक हेअरकट काही काळ केला. 

बज कट

धोनीने २०१० मध्ये बज कट केला, यात केस अगदी छोटे केले जातात. पण २०११ मध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकला आणि त्याने फायनल जिंकल्याच्या दुसऱ्याच दिवशी धोनीने डोक्यावरील सर्व केस काढून टक्कल केले. 

मोहॉक कट

वर्ल्ड कप २०११ नंतरच्या एका आयपीएलमध्ये धोनीने चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळताना केसांचा मोहॉक कट केला होता. आयपीएलमध्ये धोनीच्या बॅटची चलती होती, त्यामुळे त्याच्या लूकचीही प्रचंड चर्चा झाली. मोहॉक कट प्रकारात मध्यभागी केस ठेवून कानाजवळचे केस पूर्णपणे कापतात.

बायोपिकच्यावेळी बदलला लूक

धोनीच्या यशोगाथेवर बायोपिक तयार झाला. एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी हा सिनेमा २०१६ मध्ये प्रदर्शित झाला. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने सिनेमात धोनीची भूमिका साकारली. या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी धोनीने केसांचा नवा हँडसम लूक केला. या लूकचे कौतुक झाले.

व्ही व्हॉक लूक

बायोपिक नंतर धोनीने केसांचा व्ही व्हॉक लूक केला. सेलिब्रेटी हेअर स्टायलिस्ट आणि बिग बॉस सीझन सहाची स्पर्धक सपना भवनानी हिने धोनीचा व्ही व्हॉक लूक केला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी