२२ वर्षीय गोलंदाजाच्या रॉकेटबॉलवर फसला धोनी, उडाल्या दांड्या

इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल)च्या १४ व्या सीझनसाठी चेन्नई सुपर किंग्स जोरदार तयारी करत आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये संघाने जोरदार तयारी सुरू केली आहे.

MS Dhoni gets stump out on Rocket ball of twenty two year baller
एम. एस. धोनी  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल)च्या १४ व्या सीझनसाठी चेन्नई सुपर किंग्स जोरदार तयारी सुरू.
  • चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये सुरू आहे तयारी.
  • हरिशंकर रेड्डीच्या वेगवान चेंडूवर बाद झाला धोनी.

चेन्नई: इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल)च्या १४ व्या सिझनसाठी चेन्नई सुपर किंग्स जोरदार तयारी करत आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये संघाने जोरदार तयारी सुरू केली आहे. याठिकाणी  त्यांचा सराव सुरू झाला आहे. खेळाडू फार मेहनत करताना दिसत आहेत. संघाने कर्णधार धोनीचा एक व्हिडिओसुद्धा शेअर केला होता. ज्यात ते मोठ-मोठे शॉट खेळताना दिसत आहेत. त्यासोबतच धोनीचा आणखी एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. 

या व्हिडिओत कर्णधार धोनी २२ वर्षाचे वेगवान गोलंदाज हरिशंकर रेड्डी यांच्या चेंडूवर क्लिन बोल्ड झाल्याचे दिसत आहेत. रेड्डीच्या चेंडूत इतकी ताकद होती की धोनीला तो हाताळताच आला नाही आणि चेंडू सरळ स्टंपवर जाऊन आदळला आणि धोनीच्या दांड्या गुल झाल्या. 

व्हिड़िओत आपल्याला हरिशंकर रेड्डीची गोलंदाजी स्पष्टपणे दिसत आहे. त्यांच्या चेंडूचा वेग इतका जास्त होता की धोनीला चेंडू कळलाही नाही आणि ते क्लीन बोल्ड झाला. हरिशंकर रेड्डीने त्यानंतर महेंद्रसिंह धोनीसोबत उभे असल्याचा एक फोटोही शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये Dream pic असे लिहिले आहे. या फोटोत दोघांनीही सीएसकेची जर्सी घातली आहे. 

हरिशंकर रेड्डी  याला चेन्नई सुपर किंग्सने २० लाख रूपयात आपल्या संघात सामील केले आहे. या दमदार गोलंदाजाने आंंध्र प्रदेशकडून विजय हजारे चषकात आणि सैय्यद मुश्ताक चषक स्पर्धेत धडाकेबाज गोलंदाजी केली आहे. त्याने विजय हजारे चषकात गुजरात विरूद्ध ६० धावा देऊन तीन बळी घेतले होते. तसेच, झारखंडविरूद्ध ३० धावा देऊन चार बळी घेतले होते. लिस्ट ए सामन्यात त्यांनी आजवर ८ विकेट आपल्या नावावर केल्या आहेत. त्यांनी १३ टी२० सामन्यांत १९ विकेट आपल्या नावे केले आहेत.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी