लॉकडाऊनमध्ये गर्लफ्रेडची आठवण येणाऱ्या युवकाने मागितली मदत, मुंबई पोलिसांच्या उत्तराने जिंकली मने

व्हायरल झालं जी
Updated Apr 22, 2021 | 21:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

महाराष्ट्रात कोरोनाच्या थैमानामुळे मुंबईत १४४ कलम लागू करण्यात आले आहे. मात्र अशात एक तरुण लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे आपल्या गर्लफ्रेंडला भेटू शकत नव्हता. तेव्हा त्या तरुणाने पोलिसांकडेच मदत मागितली.

Mumbai police reply on twitter to young man wanted to meet girlfriend goes viral
गर्लफ्रेंडला भेटू इच्छिणाऱ्या तरुणाला मुंबई पोलिसांचे मार्मिक उत्तर 

थोडं पण कामाचं

  • तरुणाची गर्लफ्रेंडला भेटण्याची इच्छा
  • मुंबई पोलिसांनी दिले मार्मिक उत्तर
  • सोशल मीडियावर कॉमेंट्सचा पाऊस

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभर कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. कोरोना झपाट्याने पसरलेला संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. अनेक राज्यांमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले आहेत. पोलिस काटेकोरपणे निर्बंध अंमलात आणत आहेत. महाराष्ट्रात कोरोनाच्या थैमानामुळे मुंबईत १४४ कलम लागू करण्यात आले आहे. 

तरुणाचे ट्विट व्हायरल


मात्र अशात एक तरुण लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे आपल्या गर्लफ्रेंडला भेटू शकत नव्हता. त्याला आपल्या गर्लफ्रेंडची आठवण येत होती. जेव्हा त्याला काहीच उपाय सुचला नाही तेव्हा त्या तरुणाने पोलिसांकडेच मदत मागितली. यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला जे उत्तर दिले त्याचे प्रचंड कौतुक सोशल मीडियावर होते आहे. 

मुंबईत लॉकडाऊन


मुंबईत सध्या सीआरपीसी कलम १४४ लावण्यात आले आहे. यामुळे अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा आणि इतर आवश्यक सेवांसाठी कार्यरत असणाऱ्या वाहनांसाठी पोलिसांनी वेगवेगळ्या रंगाचे स्टिकर जाहीर केले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करण्यास बंधने आली आहेत. अशा परिस्थितीत एका बैचेन तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅंडलवर मदत मागितली. अश्विन विनोद नावाच्या या तरुणाने मुंबई पोलिसांना टॅग करत ट्विट केले की, "मुंबई पोलिस मी बाहेर आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला जाण्यासाठी कोणत्या रंगाच्या स्टिकरचा वापर करू? मला तिची खूप आठवण येते आहे."

मुंबई पोलिसांचे भन्नाट उत्तर


तरुणाच्या या मागणीवर मुंबई पोलिसांनीदेखील फिरकी घेत त्याला चांगलाच धडा शिकवला. मुंबई पोलिसांनी ट्विट करत उत्तर दिले की आम्हाला वाटते हे तुमच्यासाठी आवश्यक आहे. परंतु दुर्दैवाने हे आमच्या आवश्यक आणि जीवनाश्यक वस्तूंच्या श्रेणीत येत नाही. अंतरामुळे मनं जवळ येतात आणि सद्य परिस्थितीतील हे अंतर तुमचे आरोग्यदेखील चांगले ठेवेल. तुम्ही दोघेही कायम एकत्र राहावे अशीच आमची ईच्छा. हा फक्त एक टप्पा आहे.

 

मुंबई पोलिसांच्या उत्तरावर नेटिझन्स फिदा


मुंबई पोलिसांच्या या मजेदार उत्तराचे सोशल मीडियावर जबरदस्त कौतुक होते आहे. पोलिसांनी या तरुणाला जे उत्तर दिले आहे त्यामुळे नेटिझन्स फिदा झाले आहेत. सोशल मीडियावर मुंबई पोलिसांच्या या ट्विटला जोरदार शेअर केले जात आहे. शिवाय याच्यावर युजर्सच्या वेगवेगळ्या कॉमेंट्स आणि प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी या तरुणाला संयम राखण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी त्याच्या मूर्खपणावर अनेक प्रश्न उपस्थित केले. हे सर्व प्रकरण इतके चर्चेत आले की फक्त त्या तरुणाचे नावच नव्हे तर त्याचे ट्विटर अकाउंटदेखील ट्विटरवर ट्रेंड करते आहे. युजर्स यावर वेगवेगळे मीम्स आणि जोक्स शेअर करत आहेत.

देशभर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडतो आहे. औषधे, हॉस्पिटलमधील बेड आणि ऑक्सिजन यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातदेखील या बाबींनी मोठे गंभीर रुप धारण केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी