Mumbai Police Viral Video । मुंबई : मुंबई पोलीस (Mumbai Police) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. एवढेच नाही तर सोशल मीडियावर (Social Media) देखील मुंबई पोलिस खूप सक्रिय असतात. अलीकडेच मुंबई पोलिसांनी काही धमाकेदार गोष्टी शेअर केल्या आहेत. आता मुंबई पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी असे काही बॅंड वाजवले आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि लोक पोलिस कर्मचाऱ्यांचे जोरदार कौतुक करत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मुंबई पोलिसांचे जवान बॅंडवर धमाकेदार परफॉर्मन्स करत आहेत. यावेळी मुंबई पोलीस बँडच्या खाकी टीमने 'या मुस्तफा' या इजिप्शियन गाण्यावर परफॉर्मन्स केले असल्याचे सांगण्यात येत आहे. जवानांची कामगिरी पाहून लोक थक्क झाले. कारण या व्हिडिओमध्ये तुम्ही बँड सदस्यांना सनई, सॅक्सोफोन, ट्रम्पेट आणि बासरीसह विविध वाद्ये वाजवताना पाहू शकता.
अधिक वाचा : Big News: अमेरिकेला मिळाले टी-२० वर्ल्डकपचे तिकीट
या व्हिडिओला लोकांकडून खूप पसंती मिळत आहे आणि सोशल मीडियावरून लोक मुंबई पोलिसांचे कौतुक करत आहेत. यापूर्वी देखील मुबंई पोलिसांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये जवानांना 'पुष्पा द राइस' या चित्रपटाची भुरळ पडली होती. जवानांनी या चित्रपटातील 'श्रीवल्ली' गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स केले होते. त्या व्हिडिओने देखील लोकांच्या मनावर राज्य केले होते. आता पुन्हा एकदा मुंबई पोलिसांचा व्हिडिओ लोकांची मने जिंकत आहे. या व्हिडिओला यूट्यूबरवर शेअर करण्यात आले आहे. लक्षणीय बाब म्हणजे २.१४ मिनिटांच्या या व्हिडिओला ११ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
या व्हिडिओला लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने म्हटले की, "अतिशय उत्कृष्ट विविध वाद्यांसह त्यांच्या वाद्य कौशल्यासाठी मुंबई पोलिसांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. तर काही युजर्संनी हे आमचे सर्वात आवडते गाणे असल्याचे म्हटले आहे.