Shocking! म्युझियममध्ये पर्यटकांचे लपून-छपून शारीरिक संबंध, CCTV मधून झाला खुलासा

museum visitors caught in cctv having physical relation: म्युझियममध्ये आलेले कपल तेथे चक्क शारीरिक संबंध ठेवत असल्याचं समोर आलं आहे. म्युझियममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीतून हा प्रकार समोर आला आहे.

museum visitors caught in cctv having physical relation in their premises in poland management shares photos
म्युझियममध्ये पर्यटकांचे लपून-छपून शारीरिक संबंध, CCTV मधून झाला खुलासा (Photo Credit: Facebook/Fort Gerhard) 
थोडं पण कामाचं
  • म्युझियममध्ये आलेल्या नागरिकांचं धक्कादायक कृत्य
  • म्युझियममध्ये शारीरिक संबंध ठेवत असल्याचं आलं समोर
  • सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आली माहिती

Couple caught having physical relation in museum of Poland: पोलंडमधील फोर्ड गेरहार्ड सैन्य संग्रहालय पाहण्यासाठी आलेले दाम्पत्य तेथे चक्क शारीरिक संबंध ठेवत असल्याचं समोर आलं आहे. संग्रहालय प्रशासनाला तेथील सीसीटीव्ही फुटेजमधून ही माहिती कळाली आणि त्यानंतर प्रशासनाने आपल्या फेसबूक पेजवर त्याच्या संदर्भातील काही फोटो शेअर केले आहेत. (museum visitors caught in cctv having physical relations in their premises in Poland management shares photos)

जगभरात असे अनेक लोक आहेत जे अनेकदा काहीतरी नवीन करण्याच्या इच्छेने मूर्खपणाचे कृत्य करतात. पोलंडमधून असाच प्रकार समोर आला आहे. येथे काही जोडपे म्युझियममध्ये जातात आणि त्या ठिकाणी एकांत पाहून चक्क सेक्स करण्यास सुरुवात करु लागतात. त्या जोडप्यांना असे वाटते की, इथे आपल्याला कुणीही पाहत नाहीये मात्र, म्युझियममधील सीसीटीव्हीत दाम्पत्यांचे सर्व कृत्य कैद झाली आहेत.

 
Seks w muzeum… Uprzejmie uprasza się naszych Gości … jak to napisać… no prosimy ars amandi nie w muzeum! Muzeum od... Posted by Fort Gerharda - Muzeum Obrony Wybrzeża on Thursday, July 21, 2022

या दाम्पत्यांना तेथे सीसीटीव्ही असल्याची कल्पना नव्हती की ते मुद्दाम सीसीटीव्ही समोर जाऊन अशी कृत्य करत आहेत हे त्यांनाच ठावूक असावं. धक्कादायक म्हणजे असं कृत्य एकाच जोडप्याने केलेलं नाहीये तर अनेक जोडप्यांनी असे कृत्य केल्याचं म्युझियममधील सीसीटीव्हीत कैद झालं आहे.

अधिक वाचा : Monkeypox पासून बचाव करायचाय मग फिजिकल रिलेशन दरम्यान चुकूनही करू नका ही चूक, WHO ने दिला सल्ला

हे म्युझियम (संग्रहालय) पोलंडमधील प्रसिद्ध असून त्याचे नाव फोर्ट गेरहार्ड मिलिटरी म्युझियम असे आहे. या संग्रहालयात जोडप्यांनी खुलेआम शारीरिक संबंध ठेवल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेक प्रकरण समोर आल्यावर संग्रहालय प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. नागरिकांनी येथे केवळ फिरण्यासाठी आणि म्युझियम पाहण्यासाठी यावे, सेक्स करण्यासाठी येऊ नये असा संदेशच प्रशासनाने दिला आहे.

अधिक वाचा : Shocking : डान्स करता करता गेला 400 जणांचा जीव, जगातील सर्वात गूढ आजार, रहस्य कायम

संग्रहालयाच्या प्रशासनाने आपल्या फेसबूक पेजवर काही फोटोज शेअर केले आहेत. संग्रहालयातील सीसीटीव्हीत कैद झालेल्या कृत्यांच्या संबंधित हे फोटोज असून ते शेअर करण्यात आले आहेत. हे फोटोज शेअर करुन त्यांनी नागरिकांना विनंती केली आहे की, अशा प्रकारचे कृत्य कृपया संग्रहालयात किंवा संग्रहालयाच्या आवारात करू नये.

संग्रहालयात नुकतेच नवीन आणि विशेष प्रकारचे सीसीटीव्ही बसवण्यात आले. हे सीसीटीव्ही लावल्यावर प्रशासनाला जोडप्यांचे हे कृत्य दिसून आले. त्यानंतर त्यांनी आपल्या फेसबूक पेजवर फोटो शेअर करत आवाहन करत म्हटलं, "आम्ही येथे येणाऱ्या नागरिकांना सांगू इच्छितो की, संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या वस्तू या खूप पुरातन आहेत. हे संग्रहालय पहायला या मात्र, येथे आल्यावर कुठल्याही प्रकारचे गैरकृत्य करू नका."

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी