बिकनी फोटो पोस्ट केल्याने डॉक्टरचा वैद्यकीय परवाना रद्द

व्हायरल झालं जी
Updated Jun 18, 2019 | 17:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

एका महिला डॉक्टरने आपले बिकनीमधील फोटो सोशल मीडियावर सतत शेअर केल्याने तिचा डॉक्टरकीचा परवाना रद्द कला आहे. 

model_instagram
बिकनी फोटो पोस्ट केल्याने डॉक्टरचा वैद्यकीय परवाना रद्द  |  फोटो सौजन्य: Instagram

म्यानमार: आजकाल आपण छोटी-मोठी गोष्ट केली तरी त्याचे अपडेट हे सोशल मीडियावर टाकतो. यावेळी ती गोष्टी आपल्या नातेवाईकांपर्यंत, मित्रांपर्यंतही पोहचते. अनेकदा बरेच फोटोही आपण शेअर करतो. पण आता यासंबंधीच एक असं प्रकरण समोर आलं आहे की, ज्याची जगभरात चर्चा सुरु झाली आहे. त्याचं झालं असं की, म्यानमारमधील एका महिला डॉक्टरला सोशल मीडियावर एक गोष्ट शेअर केल्यामुळे डॉक्टरकीचा परवाना गमवावा लागला आहे. म्यानमारच्या या महिलेचं नाव नांग मी सान असं आहे. डॉक्टर नांग हिने काही दिवसांपूर्वीच आपला बिकनीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. पण यामुळेच म्यानमारमधील वैद्यकीय परिषद तिच्यावर खूपच संतापली. सुरुवातीला वैद्यकीय परिषदेने तिला नोटीस पाठवली. त्यानंतर तिचा डॉक्टरकीचा परवानाही रद्द केला. याचा सरळ अर्थ असा आहे की, यापुढे ती म्यानमारमध्ये प्रॅक्टिस करु शकत नाही. 

डॉक्टर नांग सान हिने आपला परवाना परत मिळावा यासाठी वैद्यकीय परिषदेचा निर्णय चुकीचा असल्याचं म्हणत त्याला जोरदार विरोधही केला आहे. हा माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्रावर घाला असल्याचं तिने म्हटलं आहे. वैद्यकीय परिषदेकडून पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की, असे फोटो हे देशाच्या संस्कृतीविरोधात आहेत. यासाठीच तिचा परवाना रद्द करण्यात आला आहे. 

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉक्टर नांग सान हिला पाठवण्यात आलेल्या नोटीसमुळे ती खूपच दु:खी आणि नाराज झाली आहे. यावेळी तिने असंही सांगितलं की, 'मेडिकल प्रॅक्टिसदरम्यान मी कधीही छोटे कपडे परिधान केलेले नाहीत.' 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

wanna be tan ???

A post shared by Nang Mwe San (@nangmwesan) on

जनरल फिजीशियन असलेली नांग सान ही सोशल मीडियावर बिकनीमधील अनेक फोटो शेअर करत आली आहे. पण तिने आपली प्रॅक्ट्रिस दोन वर्षांपूर्वीच थांबवली होती. कारण तिला मॉडेलिंगमध्ये करिअर करायचं होतं. त्यानंतर ती नेहमीच आपल्या मॉडेलिंगचे फोटो हे सोशल मीडियावर शेअर करत होती. तिने असं करू नये असं तिला वारंवार सांगण्यात आलं होतं. पण या गोष्टीकडे दुर्लक्ष करत तिने आपले बोल्ड फोटो पोस्ट करणं सुरूच ठेवलं होतं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nang Mwe San (@nangmwesan) on

'मी रुग्णांना कधीही अशा कपड्यांमध्ये भेटत नाही. त्यामुळे हा निर्णय खरंच धक्कादायक आहे.' असं म्हणत नांग हिने आपला संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, वैद्यकीय परिषदेच्या निर्णयामुळे तिच्या करिअरवर काही फरक पडतो का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बिकनी फोटो पोस्ट केल्याने डॉक्टरचा वैद्यकीय परवाना रद्द Description: एका महिला डॉक्टरने आपले बिकनीमधील फोटो सोशल मीडियावर सतत शेअर केल्याने तिचा डॉक्टरकीचा परवाना रद्द कला आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola