Viral Photo: विणकराने बनवली अप्रतिम साडी; चक्क माचिसच्या पेटीत भरली, पाहा फोटो

व्हायरल झालं जी
Updated Jan 14, 2022 | 15:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

Viral Photo On Social Media | तेलंगणातील हातमाग विणकर नल्ला विजय सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. त्यांनी माचिसेपटीत बसेल अशी साडी तयार केली आहे. ही भव्य साडी त्यानी मंत्री सबिता इंद्रारेड्डी यांना भेट दिल्याचे सांगण्यात येत आहे.

Nalla Vijay a weaver from Telangana has made a sarees that can be packed in a matchbox
विणकराने बनवली माचिसच्या पेटीत पॅक होणारी साडी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तेलंगणाच्या विणकराने बनवलेली अप्रतिम साडी.
  • माचिसच्या पेटीत पॅक होते साडी.
  • हातमाग विणकर नल्ला विजय यांनी मंत्र्याला ही साडी भेट दिली.

Viral Photo On Social Media | नवी दिल्ली : या जगात टॅलेंटची काहीही कमतरता नाही. कित्येकांना आपली कला सर्वांसमोर सादर करण्याची संधी देखील मिळते. तर काहींची कला तशीच काळाप्रमाणे मागे राहत जाते. मात्र सोशल मीडियामुळे कित्येक सामान्यांना देखील आपली कला जगजाहीर करण्याची संधी मिळत आहे. अशाच एका कलाकराने त्याची कला सादर करताना अशी काही साडी बनवली आहे की ती माचिसच्या पेटीत बंद होते. त्या व्यक्तीचे टॅलेंट पाहून लोक आश्चर्यचकित झाले असून सोशल मीडियावर त्याचे जोरदार कौतुक होत आहे. (Nalla Vijay a weaver from Telangana has made a sarees that can be packed in a matchbox). 

माहितीनुसार, तेलंगणातील हातमाग विणकर नल्ला विजय (Nalla Vijay) सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. त्यांनी माचिसेपटीत बसेल अशी साडी तयार केली आहे. ही भव्य साडी त्यानी मंत्री सबिता इंद्रारेड्डी यांना भेट दिल्याचे सांगण्यात येत आहे. अशी साडी तयार करण्यासाठी त्यांना सुमारे ६ दिवस लागले असे विजय यांनी सांगितले. मात्र मशीनचा वापर केल्यास ही साडी दोन दिवसांत तयार होऊ शकते, असेही त्यांचे म्हणणे आहे. पारंपरिक पध्दतीने ही साडी तयार करण्यासाठी एकूण १२ हजार रुपये खर्च येतो. तर मशिनद्वारे तयार करण्यासाठी आठ हजार रुपये खर्च केले जातात.

https://twitter.com/MinisterKTR/status/1480916168902909956?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1480916168902909956%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.timesnowhindi.com%2Ftrending-viral%2Farticle%2Ftelangana-weavers-made-sarees-that-fit-in-matchbox-photos-goes-viral%2F382338

सोशल मीडियावर नल्ला यांचे कौतुक 

लक्षणीय बाब म्हणजे नल्ला यांनी अशा प्रकारे आपली प्रतिभा दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०१५ मध्ये नल्ला यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांना अशाच हाताने बनवलेली सुपर फाइन सिल्क साडी भेट दिली होती. त्यावेळीही त्यांच्याबद्दल बरीच चर्चा झाली होती. महत्त्वाचे म्हणजे त्यांचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि लोक त्याचे कौतुक करत मजेदार प्रतिक्रिया देत आहेत

.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी