जगातील सर्वात महाग कबुतर बनला 'न्यू किम', किंमत तब्बल...

व्हायरल झालं जी
Updated Nov 18, 2020 | 18:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

जगातील सर्वात महागड्या कबुतराबद्दल बोलत आहोत, हा बहुमान न्यू किम' नावाच्या कबुतराला मिळाला आहे. हा कबुतर खरेदी करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

most expensive pigeon in the world (Symbolic photo)
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • आकाशात कबुतरे उडताना पाहणे सर्वांनाच आवडते
  • 'न्यू किम' नावाचे कबुतर लिलावासाठी ठेवण्यात आले होते आणि चीनमधील एका व्यक्तीने सुमारे १४ कोटींच्या बोलीसह ते विकत घेतले
  • न्यू किम हे एक रेसिंग कबूतर आहे

आकाशात कबुतरे उडताना पाहणे सर्वांनाच आवडते, त्यांची स्वछंद भरारी लोकांना स्वातंत्र्याची जाणीव करून देते, कबुतरांची रेसिंग अजूनही लोकप्रिय आहे. पण इथे आपण जगातील सर्वात महागड्या कबुतराबद्दल बोलत आहोत, हा बहुमान 'न्यू किम' नावाच्या कबुतराला मिळाला आहे. हे कबूतर लिलावात १४ कोटी रुपयांहून अधिक किंमतीला विकत घेण्यात आले आहे, हा कबुतर अज्ञात चीनी नागरिकाने विकत घेतले होते, त्याने आपली ओळख जाहीर केलेली नाही.

असे म्हटले जाते की सुमारे ४५० कबुतरे या लिलावात आणण्यात आली होती, गॅस्टन व्हॅन आणि त्याचे मुलगे रेसिंग कबुतर वाढवतात आणि त्यांना रेसिंग आणि वेगाने उड्डाण करण्याचे प्रशिक्षण देतात.या लिलावात ते देखील हजर होते.

सुमारे १४ कोटी रुपयांची बोली

मीडिया रिपोर्टनुसार, कबुतरांच्या विविध प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी काम करणार्‍या पिजन पॅराडाइझ या संस्थेने बेल्जियममधील ब्रुसेल्समध्ये ऑनलाईन लिलाव आयोजित केला होता. त्यात 'न्यू किम' नावाचे कबुतर लिलावासाठी ठेवण्यात आले होते आणि चीनमधील एका अज्ञात व्यक्तीने सुमारे १४ कोटींच्या बोलीसह ते विकत घेतले.

न्यू किम एक चांगल्या जातीचे रेसिंग कबुतर 

पिजन पॅराडाइझच्या मते, न्यू किम हे एक चांगल्या जातीचे रेसिंग कबुतर आहे. युरोप आणि चीनमध्ये वेगवेगळ्या पातळीवरील रेस आयोजित केल्या जातात. गेल्या वर्षी अरमंडो नावाचे कबुतर ११ कोटींच्या बोलीसह खरेदी करण्यात आले होते, तर 'न्यू किम'च्या लिलावाने हा विक्रम मोडला आहे. पॅराडाइझचे अध्यक्ष गिजेलब्रेक्ट म्हणाले, "माझा असा विश्वास आहे की हा जागतिक विक्रम आहे, इतक्या किंमतीवर अद्याप कोणताही अधिकृत लिलाव झाला नाही"

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी