VIDEO: बॉलिवूडच्या गाण्यावर न्यूझीलंड पोलिसांनी धरला ठेका, या गाण्यावर थिरकले पोलीस

व्हायरल झालं जी
Updated Nov 19, 2020 | 17:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

New Zealand police's dance on Bollywood songs: न्यूझीलंडच्या वेलिंग्टनमध्ये दिवाळी सणादरम्यान न्यूझीलंडच्या पोलिसांनी बॉलिवूडच्या गाण्यांवर ठेका धरत साऱ्यांची मने जिंकली.

Newzealand police
VIDEO: बॉलिवूडच्या गाण्यावर न्यूझीलंड पोलिसांनी धरला ठेका 

थोडं पण कामाचं

  • वेलिंग्टन इंडियन असोसिएशनने हा व्हिडिओ फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे.
  • दिवाळी सणादरम्यान हे न्यूझीलंडचे पोलीस अधिकारी एकत्र जमले होते. 
  • यात बॉलिवूडचे गाणे  'काला चश्मा' आणि 'कर गई चुल हे सुरू झाले तेव्हा हे न्यूझीलंडच्या पोलिसांनी चांगलाच ठेका धरला.

मुंबई: बॉलिवूडच्या गाण्यांवर आपणच केवळ थिरकत नाही तर अशी काही गाणी इतकी पॉप्युलर आहेत जी परदेशांतही लोकप्रिय आहेत. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात न्यूझीलंडचे पुरुष आणि महिला पोलीस अधिकारी जोरदार डान्स करत आहेत. हा व्हिडिओ दिवाळी सेलिब्रेशनशी संबंधित आहे. दिवाळी सणादरम्यान हे न्यूझीलंडचे पोलीस अधिकारी एकत्र जमले होते. 

हा समारंभ न्यूझीलंडच्या वेलिंग्टन पोलीस कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आला होता. शहराच्या इंडियन असोसिएशनने दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी या समारंभाचे आयोजन केले होते. यात बॉलिवूडचे गाणे  'काला चश्मा' आणि 'कर गई चुल हे सुरू झाले तेव्हा हे न्यूझीलंडच्या पोलिसांनी चांगलाच ठेका धरला. हैराण करणारी गोष्ट म्हणजे त्यांचे अनेक स्टेप्स बॉलिवूडच्या या गाण्याच्या धूनला मॅच करत होते.

वेलिंग्टन इंडियन असोसिएशनने हा व्हिडिओ फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे. इंडियन रॅपर बादशाहचे गाणे कर गई चुल जेव्हा वाजले तेव्हा या पोलिसांनी केलेला डान्स हा साऱ्यांनाच हैराण करणारा होता. बॉलिवूडच्या गाण्यावर हे पोलीस अधिकारी जूबरदस्त थिरकले. पुरुष आणि महिला दोघांच्या डान्सिंग स्टेप्स देखण्यासारखे होते. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की बॉलिवूडच्या गाण्याचा हे पोलीस अधिकारी भरपूर आनंद घेत आहेत.

बॉलिवूडची गाणी देशातच नव्हे तर विदेशातही लोकप्रिय आहेत. बॉलिवूडच्या गाण्यांचे सगळ्यांच्याच मनात एक विशेष स्थान आहे. परदेशी लोकांना बॉलिवूडची गाणी विशेष आवडतात. हा व्हिडिओ फेसबुकशिवाय, इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केला होता. सगळीकडून या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक युजर्सनी यांनी केलेल्या डान्सचे खूप कौतुक केले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी