[VIDEO] नितीन नांदगावकर इन अॅक्शन... माटुंग्यात मुलीची छेड काढणाऱ्या विकृताला बेदम चोप 

माटुंग्यात तरुणीची छेड काढणाऱ्या विकृताला नितीन नांदगावकर यांनी बेदम चोप दिला आहे. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर देखील केला आहे. 

nitin nandgaonkar beaten matunga pervert accused who molested the girl see video 
[VIDEO] नितीन नांदगावकर इन अॅक्शन... माटुंग्यात मुलीची छेड काढणाऱ्या विकृताला बेदम चोप   |  फोटो सौजन्य: Facebook

मुंबई: मुंबईतील माटुंगा रेल्वे स्थानकावरील पुलावर दिवसाढवळ्या मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी चांगलाच चोप दिला आहे. साधारण १५ दिवसांपूर्वी मांटुगा रेल्वे स्थानकात दिवसाढवळ्या महिलांची छेडछाड काढल्याची घटना समोर आली होती. ही घटना स्टेशनवरील असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यामुळे मुंबई महिलांसाठी सुरक्षित आहे का? असा सवाल विचारला जात होता. 

पोलिसांनी या विकृत आरोपीला अटक देखील केली होती. मात्र, त्याला जामिनावर सोडण्यात आलं होतं. यानंतर शिवसेनेच्या नितीन नांदगावकर यांनी आपल्या स्टाइलमध्ये आरोपीला धडा शिकवला आहे. आठ दिवस आरोपीचा शोध घेत असल्याचंही नितीन नांदगावकर यांनी म्हटलं आहे. नांदगावकर यांनी आरोपीला आपल्या कार्यालयात आणून चांगलाच चोप दिला आहे. या सगळ्याचा व्हिडिओ देखील नांदगावकर यांनी आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. 

नेमकं प्रकरण काय?
 
माटुंगा स्थानकातील पुलावर एका विकृतानं दोन मुलींसोबत छेडछाड केली होती. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. ही घटना 26 जानेवारी माटुंगा स्थानकावर दुपारी घडली होती. एक तरूणी पुलावरून जात असताना विकृताने तिच्या मागून जात तिची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यानं लगेचच तिथून पळ काढला. या विकृताला रेल्वे पोलिसांनी अटक देखील केली होती. मात्र नंतर त्याची जामिनावर सुटका झाली. 

दरम्यान, हा व्यक्ती रेल्वे स्थानकावर महिलांना स्पर्श करताना सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. इतकंच नाही तर तो हस्तमैथून देखील करत होता. रजिऊर खान असं या विकृताचं नाव आहे.

२५ जानेवारीला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तो एका महिलेचा पाठलाग करताना सीसीटीव्हीत दिसतोय. यानंतर तो आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करुन घेतो आणि महिलेकडे पाहून हस्तमैथून करण्यास सुरुवात करतो. त्यानंतर २६ जानेवारीला तो पुन्हा एकदा त्याच महिलेचा पाठलाग करताना दिसतो. यावेळी तो जबरदस्ती तिच्या गालावर किस करण्याचा प्रयत्न करतो आणि तिथून पळ काढतो. आणखी एका घटनेत माटुंगा पुलावर दोन महिला एकमेंकीसोबत बोलताना दिसत आहेत. त्यावेळी सुद्धा त्यानं त्यातल्या एका महिलेला स्पर्श केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी