JOB: 'या' कामासाठी मिळणार प्रत्येक महिन्याला 6.5 लाख पगार

Weird Job: एका कंपनीला कँडी प्रेमीला नियुक्त करायचे आहे, जो कँडी खाईल आणि चव एक्सप्लोर करेल. त्याला कंपनी चांगला पगार देणार आहे.

no age limit no worry about going to office just for this one work company will give a monthly salary of 6 lakh rupees
JOB: 'या' कामासाठी मिळणार प्रत्येक महिन्याला 6.5 लाख पगार 
थोडं पण कामाचं
  • आश्चर्यकारक नोकरी
  • कँडी खा आणि चव एक्सप्लोर करा
  • या नोकरीसाठी अनेकांनी केले अर्ज

Viral News: या जगात अनेक प्रकारच्या नोकऱ्या (Jobs) आहेत, ज्या लोकांना करायला आवडतात. इतकंच नाही तर नोकरी मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतात. पण, आज आम्ही तुम्हाला ज्या नोकरीबद्दल सांगणार आहोत, ते जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल आणि तुम्हाला प्रश्न पडेल की असे खरोखर होते का? कारण, हे काम करणाऱ्या व्यक्तीला चांगला पगारही दिला जाणार. (no age limit no worry about going to office just for this one work company will give a monthly salary of 6 lakh rupees)

आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल की हे असं नेमकं काय काम आहे की ज्याची थेट बातमी होत आहे? तर आम्ही तुम्हाला सांगतो की, या नोकरीमध्ये फक्त कँडी खावी लागेल आणि त्याऐवजी महिन्याला दीड लाख रुपये पगार दिला जाईल.

नोकरीबद्दल जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. वास्तविक, कॅनडास्थित कँडी फनहाऊस नावाच्या कंपनीने एक जाहिरात काढली आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, कंपनी अशा कर्मचाऱ्याला कामावर ठेवू इच्छिते ज्याला कँडी आवडते. कर्मचार्‍याला कँडी खाणे आणि चव एक्सप्लोर करणे आवश्यक आहे. कँडीची चव घेतल्यानंतर कर्मचाऱ्याला त्याबाबत योग्य तो रिव्ह्यू द्यावा लागेल. या कामासाठी कंपनी  कर्मचाऱ्याला वर्षाला तब्बल ७८ लाख रुपये पगार देईल.

अधिक वाचा: Viral Video: धावत्या कारमधून चिमुकली रस्त्यावर पडली आणि मग..., अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

व्वा काय नोकरी आहे...

कंपनी ऑफर करत असलेल्या नोकरीचे नाव 'चीफ कँडी ऑफिसर' आहे. एवढेच नव्हे तर कर्मचाऱ्याला कार्यालयात जाण्याचीही गरज भासणार नाही. बस कामगार दर महिन्याला सुमारे 3500 उत्पादनांची चाचणी घेतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या नोकरीसाठी वयाची कोणतीही अट नाही. 

अधिक वाचा: Viral Video: वाघाला घास भरवण्यासाठी उघडली बसची खिडकी, पाहा पुढे काय घडलं!

अवघ्या पाच वर्षांचे मूलही या नोकरीसाठी अर्ज करू शकते. त्याच वेळी, अर्जदार उत्तर अमेरिकेचा रहिवासी आणि कँडी प्रेमी असणे आवश्यक आहे. या पदासाठी तुम्ही ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकता. जाहिरात आल्यानंतर अनेकांनी या नोकरीसाठी अर्ज केले आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियावरही या नोकरीची जोरदार चर्चा सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी