नवी दिल्ली: हौसेला मोल नाही ही प्रसिद्ध म्हण आपण ऐकतोच. मात्र इथे अमेरिकन रॅपर (American rapper) लिल उजी वर्टने ती सिद्ध करून दाखवली आहे. त्याने कपाळावर (forehead) 175 कोटी रुपयांचा हिरा (diamond) जडवला आहे. त्याने या हिऱ्यासह आपले फोटो (photos) सोशल मीडियावर (social media) टाकले होते जे व्हायरल (viral) होत आहेत आणि लोक त्याच्यावर जोरदार कॉमेंट्सही (comments) करत आहेत.
या हिऱ्याची खास गोष्ट अशी की गुलाबी रंगाचा हिरा हा फार महाग असतो. 11 कॅरेटच्या या हिऱ्याची किंमत 24 मिलियन डॉलर आहे. भारतीय चलनात याची किंमत 175 कोटी रुपये होते. वार्टने सांगितले की तो इलियट या डिझाईन कंपनीला यासाठी गेल्या चार वर्षांपासून पैसे चुकते करत होता. त्याने सांगितले की गुलाबी हिरा घालणे हे त्याचे स्वप्न होते ज्यासाठी त्याने ही किंमत मोजली.
वर्टने त्याचा एक व्हिडिओही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे ज्यात त्याच्या डोक्यावर तो हिरा दिसत आहे. सोशल मीडियावर लोक यावर खूप कॉमेंट्स करत आहेत. त्याने ट्वीट करत लिहिले आहे की तो 2017पासून या हिऱ्याची किंमत चुकती करत आहे. त्याने इलियांटे या हिऱ्यांचा व्यापार करणाऱ्या कंपनीकडून तो विकत घेतला आहे.
जगभरात आपल्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या रॅपर उजी वर्टचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लवकरच तो नवा व्हिडिओ टाकणार असल्याचेही त्याने सांगितले आहे. लोक त्याला या हिऱ्याबद्दल अनेक प्रश्न विचारत आहेत.