सू-सू करण्यासाठी कारमधून उतरला व्यक्ती, BMW घेऊन फरार झाले चोर 

Noida: नोएडामध्ये एका व्यक्तीकडून काही लुटारूंनी त्याची BMW कार लूटली. पोलिसांनी सांगितले की पीडित व्यक्ती रस्त्यावर लघवी करण्यासाठी उतरला, तेव्हा लुटारूंनी त्याची कार लूटली. 

noida news miscreants fled away with a bmw car after the man driving it pulled up to urinate crime news in marathi tcri 33
 सू-सू करण्यासाठी कारमधून उतरला व्यक्ती, BMW घेऊन फरार झाले चोर  

थोडं पण कामाचं

  • रस्त्यात मूत्रविसर्जन पडले महागात
  • बंदूक दाखवून पळवून नेली बीएमडब्ल्यू कार
  • नातेवाईकाची कार वापर होता पीडित

नवी दिल्ली  : उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये काही अज्ञात व्यक्ती एक बीएमडब्ल्यू कार घेऊन पसार झालेत. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना शनिवारी रात्री फेज २ पोलीस स्टेशनच्या हद्दीत सेक्टर ९० मध्ये घडली. सांगितले जाते की ही कार एका स्टॉक ब्रोकरची आहे. तो रात्री पार्टीहून घरी येत होता. त्यावेळी तो दारू प्यायला होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही लक्झरी कार या स्टॉक ब्रोकरच्या नातेवाईकाच्या नावावर आहे. यासाठी ४० लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. डेप्युटी पोलीस कमिशनर सेंट्रल नोएडा हरिश चंदर यांनी सांगितले की,  आम्हांला जसे कळाले की एका व्यक्तीची बीएमडब्ल्यू कार चोरीला गेली आहे. आमची टीम घटनास्थळी पोहचली. त्यांनी सांगितले की पीडित व्यक्तीने कार रस्त्याच्या कडेला उभी केली आणि मूत्रविसर्जन करायला गेला. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी चावी असलेली कार सुरू केली आणि घेऊन फरार झाले. 

डीसीपीनी सांगितले की, प्राथमिकदृष्ट्या असे दिसते की कार पळवून नेण्याची योजना मालकाच्या ओळखीच्या व्यक्तीनेच केलेली आहे. या प्रकरण अज्ञात व्यक्तींच्या नावे एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करून कार लवकरात लवकर शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

पीडित व्यक्तीने सांगितले की हे मोटार चोर बाईकवरून आले होते. त्यांनी माझ्या पाठीवर बंदूक धरली आणि गाडी घेऊन पळून गेले. हे अजून स्पष्ट झाले नाही की कार चालक हा दारूच्या नशेत होता की नाही. तो गेल्या ६-७ दिवसांपासून आपल्या नातेवाईकाची कार वापरत होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी