एका आंब्याची किंमत तब्बल ५०० रुपयांपर्यंत, जाणून घ्या काय आहे या आंब्याची वैशिष्ट्ये

व्हायरल झालं जी
Updated May 19, 2019 | 22:38 IST | टाइम्स नाऊ हिंदी

आंबा खाण्याची इच्छा प्रत्येकाचीच असते, त्यासाठी बाजारात खरेदीसाठी नागरिक गर्दी करतात मात्र, एक आंबा चक्क ५०० रुपयांना विकला जातो अशी माहिती समोर येत आहे. पाहूयात कुठला आहे हा आंबा आणि का इतक्या महाग विकला जातो.

Queen of Mangoes
आंब्याची राणी नुरजहा 

मुंबईः “आंब्यांची राणी” म्हणुन प्रख्यात “नूरजहा” जातीचा आंबा आपल्या भरभक्कम आकारमानासाठी प्रसिद्ध आहे. मागील वर्षी मात्र आळ्यांच्या भीषण हल्ल्याने संपुर्ण आंब्याचा मोहोर नासवला. नूरजहाचे प्रेमी याचा अस्वाद घेण्यापासून वंचित राहिले. पण आता आंब्याच्या या दूर्लभ जातीच्या प्रेमींसाठी खूषखबर आहे. यंदा अनुकूल वातावरण मिळाल्याने आब्यांची झाड मोहरानं बहरली आहेत. नूरजहाच्या फळाची लांबी साधारणतः एक फूटापर्यंत असते. १५० ते २०० ग्राम इतके गुठळीचे वजन असते. नूरजहाच पीक कमी येत असल्याने हा आंबा तुम्हाला खायची ईच्छा असेल तर आपल्याला याची आधी बुकिंग करावी लागेल. कारण, फळ झाडावर असतानाच याची जवळपास संपुर्ण बुकिंग झालेली असते. मागणी वाढल्यास या आंब्याची किंमत ५०० रूपयांच्या आसपास पोहोचलेली असते. 

मुळचा अफगानिस्तानी जातीचा मानला जाणाऱ्या “नूरजहा”चे निवडक झाडं मध्यप्रदेशच्या अलीराजपूर जिल्ह्यातील कठ्ठीवाडा भागातच आढळतात. इंदूरपासून जवळपास २५० किलोमीटर अंतरावरील कठ्ठीवाडा येथील नूरजहा जातीचे विशेषज्ञ इशाक मंसुरी यांनी सांगितले, ‘यंदा हवामान अनुकूल असल्यामुळे नुरजहाची बाग चांगलीच बहरली आहे. आम्ही चांगले पीक येण्याची आशा बाळगत आहोत.” पुढे त्यांनी सांगितले, ‘जानेवारी महिन्यातच झाडांना मोहोर येण्यास सुरुवात होते आणि साधारणतः जून महिन्याच्या अखेरपर्यंत फळं पिकून तयार झालेली असतात. यावर्षी एका फळाचे वजन २.५ किलोग्रामच्या आसपास असण्याचा अंदाज लावण्यात येत आहे.’   

तर तज्ञांच्या मते मागील दशकातील हवामानातील बदल, अल्पवृष्टी, अतिवृष्टी या कारणांमुळे नूरजहाच्या फळांच्या वजनात सातत्यानं घट नोंदवली जात आहे. ही गोष्ट धक्कादायक आहे की, मागील काळात नूरजहाच्या फळांच वजन साधारणतः ३.५ ते ३.७५ किलोग्राम दरम्यान असायचं. हवामानातील बदलामुळे या दुर्लभ जाती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.

मंसूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मागील काही वर्षांमध्ये कठ्ठीवाडच्या बाहेरील भागात नुरजहाच्या कलमांचे पुनःरोपण करण्याचे प्रयत्न झाले पण झाडे जगू शकली नाहीत. आंब्यांची ही जात हवामानातील बदलाप्रती अतिशय संवेदनशील आहे. एखाद्या लहान मुलासारखी या झाडांची काळजी घ्यावी लागत असल्याचेही त्यांनी सांगितलं.’ 

मागील वर्षी नूरजहाच्या प्रेमींना आळ्यांच्या संक्रमानामुळे संपुर्ण पीक नासल्यानं निराश व्हावे लागले होते. पुढे मंसुरी यांनी सांगितले, 'मागच्या वर्षी आळ्यांनी संपुर्ण मोहर खाऊन टाकला होता. पण यंदा “नुरजहा”चे चांगले पीक आल्याने मंसुर आनंदी आहेत. आणि नुरजहा प्रेमी आंब्यांचा मनमुराद आनंद घेऊ शकतील.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
एका आंब्याची किंमत तब्बल ५०० रुपयांपर्यंत, जाणून घ्या काय आहे या आंब्याची वैशिष्ट्ये Description: आंबा खाण्याची इच्छा प्रत्येकाचीच असते, त्यासाठी बाजारात खरेदीसाठी नागरिक गर्दी करतात मात्र, एक आंबा चक्क ५०० रुपयांना विकला जातो अशी माहिती समोर येत आहे. पाहूयात कुठला आहे हा आंबा आणि का इतक्या महाग विकला जातो.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola