अमेरिकेतला न्यूडिस्ट क्लब, विना कपडे राहणाऱ्यांचा क्लब

Nudist Club Of America People Live Without Clothes These Are The Rules : अमेरिकेतील इंडियाना प्रांतातील ब्लूमिंगटन येथे एक न्यूडिस्ट क्लब आहे. हा क्लब फर्न हिल न्यूडिस्ट क्लब या नावाने ओळखला जातो.

Nudist Club Of America People Live Without Clothes These Are The Rules
अमेरिकेतला न्यूडिस्ट क्लब, विना कपडे राहणाऱ्यांचा क्लब  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • अमेरिकेतला न्यूडिस्ट क्लब, विना कपडे राहणाऱ्यांचा क्लब
  • फर्न हिल न्यूडिस्ट क्लब
  • क्लबमध्ये विनाकपडे राहणाऱ्या महिला आणि पुरुषांनाच प्रवेश

Nudist Club Of America People Live Without Clothes These Are The Rules : अमेरिकेतील इंडियाना प्रांतातील ब्लूमिंगटन येथे एक न्यूडिस्ट क्लब आहे. हा क्लब फर्न हिल न्यूडिस्ट क्लब या नावाने ओळखला जातो. या क्लबमध्ये विनाकपडे राहणाऱ्या महिला आणि पुरुषांनाच प्रवेश आहे. 

सौंदर्य हे मानवी शरीरात नाही तर स्वभावात दडले आहे. प्रत्येक शरीर हे वेगवेगळे असले तरी संबंधित व्यक्तींचा स्वभाव महत्त्वाचा आहे. या उद्देशाने स्थापना केलेल्या फर्न हिल न्यूडिस्ट क्लबला ७५ वर्षे झाली आहेत.

क्लबमध्ये राहणारी मंडळी वेगवेगळे खेळ खेळत वेळ मजेत घालवतात. लग्न झालेल्यांना आपल्या जोडीदारासोबतच क्लबमध्ये प्रवेश मिळतो. या क्लबमध्ये महिला आणि पुरुष यापैकी कोणाच्याही अंगावर कपडे नसतात. पण एवढी वर्षे झाली तरी क्लबमध्ये एकही शारीरिक छळाची किंवा बलात्काराची घटना घडल्याची नोंद नाही. 

ज्या व्यक्तींना स्वतःवर नियंत्रण ठेवणे जमते त्यांचाच क्लबमध्ये प्रवेश देण्यासाठी विचार होते. क्लबचे अधिकारी संबंधित व्यक्तीच्या स्वभावाची आणि चारित्र्याची चौकशी करून खात्री करून घेतात. यानंतरच क्लबमध्ये प्रवेश दिला जातो.

महिला आणि पुरुष यांना नैसर्गिक वास्तव समजावे यासाठीच क्लबची स्थापना करण्यात आली आहे; असे क्लबच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. क्लब ८३ एकर भूखंडावर पसरला आहे. 

क्लबमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला स्वतःसोबत एक टॉवेल बाळगण्याचे आणि त्या टॉवेल वरच बसण्याचे बंधन आहे. स्वच्छता आणि आरोग्याशी संबंधित नियमांचे पालन क्लबमध्ये व्यवस्थित केले जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी