Viagra: असा वाचला जीव! कोरोनाबाधित नर्सला शुद्धीवर आणण्यासाठी दिली 'व्हायग्रा', ४५ दिवसांनी 'कोमा'तून परतली!

इंग्लंडमधील  गेन्सबरो, लिंकनशायर येथील एक कोरोनाबाधित परिचारिका (नर्स) सुमारे दीड महिन्यापासून कोमात होती, परंतु व्हायग्रा दिल्यानंतर तिला शुद्धी आल्याचे सांगण्यात येत आहे.

nurse wakes from 45 day covid coma after medics give her viagra in uk
नर्सला शुद्धीवर आणण्यासाठी दिली 'व्हायग्रा' 
थोडं पण कामाचं
  • इंग्लंडमधील  गेन्सबरो, लिंकनशायर येथील एक कोरोनाबाधित परिचारिका (नर्स) सुमारे दीड महिन्यापासून कोमात होती,
  • व्हायग्रा दिल्यानंतर तिला शुद्धी आल्याचे सांगण्यात येत आहे.
  • 'द सन'च्या वृत्तानुसार, मोनिका अल्मेडा नावाच्या परिचारिकेकडे दोन्ही डोस घेतले Viagra,Viagra treat covid 19, Monica Almeida, Viagra Covid coma, corona affected nurse,UK Nurse Viagra,

नवी दिल्ली : गेल्या ४५ दिवसांपासून कोमात गेल्या कोरोना बाधित (Nurse)चे प्राण वाचविण्याचे एका अनोखा प्रयोग करण्यात आला. प्रायोगित उपचार पद्धतीनुसार (experimental treatment regime) तिला व्हायग्राचा डोस देण्यात आला. हा प्रकार इंग्लंडमध्ये समोर आला. (nurse wakes from 45 day covid coma after medics give her viagra in uk)


'द सन'च्या वृत्तानुसार, मोनिका अल्मेडा नावाच्या परिचारिकेकडे दोन्ही डोस घेतले असूनही तिची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली, त्यानंतर तिची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले.

कोरोनामुळे कोमात गेलेल्या महिला परिचारिकेसाठी व्हायग्राने जीव वाचवल्यासारखे काम केले आहे, पेशाने नर्स असलेल्या मोनिका आल्मेडा ४५ दिवसांपासून कोमात होत्या आणि ती शुद्धीवर आली नव्हती. प्रयोग म्हणून तिला व्हायग्रा देण्यात आला. त्यानंतर काही वेळात तिला शुद्ध आली. 

ही कल्पना नर्स मोनिकाच्या सहकर्मचाऱ्यांची होती

मोनिकाची ऑक्सिजनची पातळी निम्म्याहून कमी झाली होती आणि ती कमी-जास्त होत होती, ही कल्पना मोनिकाच्या सहकर्मचाऱ्यांची होती जी कामी आली असे दिसते, नर्स मोनिकाला शुद्धी आल्यावर तिने डॉक्टरांना आणि तिच्या सहकाऱ्यांना धन्यवाद दिले. नर्स मोनिका म्हणाली, 'जेव्हा मी शुद्धीवर आली तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितले की मला व्हायग्राच्या मदतीने शुद्धीवर आणले आहे, सुरुवातीला मला ते मजेदार वाटले परंतु त्यांनी सांगितले की प्रत्यक्षात मला व्हायग्राचा हेवी डोस देण्यात आला आहे. .'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी