Viral News: वयाच्या 86 व्या वर्षी बॉडी बिल्डिंग, तरुणांनाही लाजवणारी शरीरयष्टी...केला हा पराक्रम

Japanese old body builder : आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाने, तुम्ही अगदी मोठी आणि अशक्य वाटणारी कामे देखील करू शकता. या मुद्द्यासंदर्भातील अनेक उदाहरणे आपल्या समोर येत असतात. मात्र वृद्धाप काळातदेखील आपल्या शारीरिक मर्यादांना न जुमानता आपली आवड जपणारे एक उदाहरण जपानी बॉडीबिल्डर तोशिसुके कानाझावा यांनी जगासमोर ठेवले आहे. वयाच्या 86 वर्षी तोशिसुके जिममध्ये घाम गाळतात.

Japanese old body builder
जपानमधील वृद्ध बॉडी बिल्डर  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • एखाद्या गोष्टीची आवड असेल तर त्यासाठी तुमचे वय किती आहे यामुळे काहीही फरक पडत नाही.
  • जपानी बॉडीबिल्डर तोशिसुके कानाझावा यांनी जगासमोर ठेवले उदाहरण
  • वयाच्या 86 वर्षी तोशिसुके घेतात बॉडी बिल्डिंग स्पर्धेत भाग

Body Building by Old Man :नवी दिल्ली : वय वाढत जाते तसे माणसाला मर्यादा येत जातात. खासकरून त्याच्या शारीरिक क्षमता कमी होत जातात, असे म्हटले जाते. त्याचबरोबर असेही म्हटले जाते की जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवड असेल तर त्यासाठी तुमचे वय किती आहे यामुळे काहीही फरक पडत नाही. आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाने, तुम्ही अगदी मोठी आणि अशक्य वाटणारी कामे देखील करू शकता. या मुद्द्यासंदर्भातील अनेक उदाहरणे आपल्या समोर येत असतात. मात्र वृद्धाप काळातदेखील आपल्या शारीरिक मर्यादांना न जुमानता आपली आवड जपणारे एक उदाहरण जपानी बॉडीबिल्डर तोशिसुके कानाझावा (Japanese old body builder) यांनी जगासमोर ठेवले आहे. त्यांची बॉडीबिल्डिंग आता जगभर व्हायरल (Viral) झाली आहे. वयाची 80 वर्षे पूर्ण करणे अनेकांना शक्य होत नाही. ज्यांनी वयाची 80 वर्षे पूर्ण केलेली असतात ते अनेकदा अंधरुणच पकडून असतात. मात्र वयाच्या 86 वर्षी तोशिसुके जिममध्ये घाम गाळतात. तोशिसुके यांना बॉडीबिल्डिंगची आवड असून त्यांनी ज्या प्रकारची बॉडी बनवली आहे तशी बॉडी बनवणे हे अनेक तरुणांनाई शक्य होत नाही. (Old man from Japan built his body like body builder at the age of 86)

अधिक वाचा  : लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी करा हे तुळशीचे उपाय

तरुणदेखील करू शकत नाहीत एवढी मेहनत

तोशिसुके कानाझावा वयाच्या 86 वर्षीदेखील हिप किंवा पाठदुखीची तक्रार करत नाहीत. महत्त्वाचे म्हणजे त्यांना व्यायामशाळेत व्यायाम करताना कोणतीही समस्या जाणवत नाही. ते जिममध्ये तासनतास घाम गाळतात. तरुणदेखील त्यांच्याएवढी मेहनत करू शकत नाहीत. त्यांची शरीरयष्टीही तुम्हाला आश्चर्यचकित करून सोडते.

अधिक वाचा  : शरद पोंक्षेंची अंदमानातून राहुल गांधींवर टीका

वयाच्या 34 व्या वर्षी निवृत्ती 

प्रसार माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार त्यांच्या तारुण्यात ते अनेक वेळा चॅम्पियन बॉडीबिल्डर होते. तोशिसुके कानाझावा यांनी वयाच्या 34 व्या वर्षी या खेळातून निवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी व्यायाम करणे बंद केले. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी नंतर मद्यपान, धूम्रपान आणि त्यांना हवे ते खाणे सुरू केले. ते अनेकदा आरशात स्वत:कडे पाहत असत आणि मग विचार करत की हे एखाद्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव चॅम्पियनचे शरीर आहे का? अखेर वयाची 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा बॉडी बिल्डिंगचा विचार केला. मग काय कानाझावा यांनी जिममध्ये जाण्यास सुरुवात केली. या वर्षी 9 ऑक्टोबर रोजी ते जपान चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणारे सर्वात वयस्कर व्यक्ती ठरले आहेत. आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांनी एक नवीन अध्याय लिहिला आहे.

टॉप 12 पर्यंतचा प्रवास

तोशिसुके कानाझावा यांचे वास्तव्य जपानमधील हिरोशिमा येथे असते. ओसाका येथील पुरुषांच्या जपान बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिपच्या 68 व्या स्पर्धेत ते तरुण शरीरसौष्ठवपटूंविरुद्ध धक्कादायक पोझ देत सहभागी झाले. दुर्दैवाने त्यांना अंतिम 12 स्पर्धकांमध्ये स्थान मिळू शकले नाही. त्यावेळी ते म्हणाले की, 'मी सहभागी होऊ शकल्याबद्दल कृतज्ञ आहे. मला आशा आहे की मी जेव्हा या वयातदेखील आव्हाने स्वीकारतो तेव्हा मी अनेकांच्या मनात स्थान मिळवतो.

अधिक वाचा  : महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील,'शिवाजी तर जुने झाले' 

अशी सुरू झाली बॉडी बिल्डिंग

तोशिसुके कानाझावा 20 वर्षांचे असताना त्यांनी पहिल्यांदा जपान चॅम्पियनशिप जिंकली. त्यानंतर वयाच्या 24 व्या वर्षी दुसरी "मिस्टर जपान" स्पर्धा जिंकली. अखेर ते वयाच्या 34 व्या वर्षी निवृत्त झाले. या आजाराने त्रस्त असलेल्या आपल्या पत्नीला प्रोत्साहन देण्यासाठी तोशिसुके कानाझावा यांनी पुन्हा याकडे वळण्याचा निर्णय घेतला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी