बाप रे बाप! एका गाईने दिला दोन डोकी असलेल्या वासराला जन्म, पाहणारे देखील झाले अचंबित

व्हायरल झालं जी
Updated Apr 14, 2023 | 16:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

Viral News : अमेरिकेतील नेवाडा येथील एका गायीच्या पोटी विचित्र वासरू जन्माला आले, जे पाहून मालकिणीचा तिच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण झाले होते. पण, हे वासरू जास्त काळ जगू शकले नाही.

बाप रे बाप! एका गाईने दिला दोन डोक्यांच्या वासराला जन्म, पाहणारे देखील झाले अचंबित
calf born with two heads and one body in usa  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • दोन डोकी आणि एक धड असलेला वासरू 
  • पाहणाऱ्यांचे त्यांच्या डोळ्यावर विश्वास ठेवणे देखील कठीण झाले होते
  • हे वासरू अधिक काळ जगू शकले नाही.

Strange news : या जगात अशा अनेक अनपेक्षित घटना घडत असतात, ज्याची कल्पना देखील आपण करू शकत नाही. तसेच त्या गोष्टी घडून जरी गेल्या तरी त्या विचित्र गोष्टींवर विश्वास ठेवणे देखील कठीण होऊन बसते. असाच काहीसा प्रकार अमेरिकेतील नेवाडा येथून समोर आला आहे, जिथे एका गायीने अशा विचित्र वासराला जन्म दिला, की तो पाहून लोकांना धक्काच बसला. कारण, हा वासरू सामान्य वासरसारखा नव्हताच, तो एखाद्या एलियन सारखा वाटत होता. अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे देखील कठीण जात होते. चला तर मग जाणून  घेऊ की काय आहे हे विचित्र प्रकरण?  (omg calf born with two heads and one body in usa)

अधिक वाचा : धोनी, चहर आणि बेन स्टोक्स खेळणार की नाही, CSK ची मोठी अपडेट

'डेली स्टार'च्या बातमीनुसार, लेस्ली हुनेविल नामक 38 वर्षीय महिला शेतकरीची गाय गाभण होत होती. मात्र, प्रसूतीदरम्यान तिला खूप समस्या येत होत्या, त्यामुळे जेव्हा डॉक्टरांनी गाईची तपासणी केली तेव्हा त्यांना कळले की प्रसूती करण्याइतपत वासराची वाढ झालेली नाही. मग गाईला त्रास नेमका कसला होत आहे, हे त्यांना काही केल्या कळत नव्हते.

शेवटी देवाची करणी बघा, त्याच रात्री गाईने एका वासराला जन्म दिला. गाई जेव्हा प्रसूत झाली तेव्हा त्या खोलीत पूर्णत: काळोख होता, तसेच खूप थंडी देखील पडली होती. त्यामुळे, नवजात वासराला लेस्ली नीट पाहू शकली नाही. पण, जेव्हा तिने त्याला जवळून पाहिले तेव्हा तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. कारण, त्या वासराला एक नाही तर दोन डोकी होती. 

अधिक वाचा : ​जाणून घ्या शुक्रवारचं राशीभविष्य

दोन डोकी आणि एक धड असलेला वासरू 

असे अनोखे वासरू पाहून लेस्लीचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. कारण पहिल्यांदाच असे वासरू तिने पाहिले होते. तिच्या मते 2500 पैकी फक्त एकच बाळ असे जन्माला येत असते. तिने पुढे सांगितले की, बछड्याला दोन डोकी आणि एक धड होते. इतकेच नव्हे तर डोक्याच्या तुलनेमध्ये त्याचे शरीर किरकोळ होते. मात्र हे वासरू जास्त काळ जगू शकले नाही, असे देखील तिने पुढे सांगितले. 

जगात अशा अनेक चित्र विचित्र घटना यापूर्वी देखील होऊन गेल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी