नवी मुंबईतील धक्कादायक घटनेचा Video !, लिफ्टमधून बाहेर पडताच तो कळवळत होता...

Dog Bite in Private Part: झोमॅटो डिलिव्हरी बॉय लिफ्टमध्ये उभा आहे. दरम्यान लिफ्ट थांबते आणि तो बाहेर पडणार तेवढ्यात लिफ्टच्या दरवाजाजवळ उभा असलेल्या कुत्र्याने डिलिव्हरी बॉयवर वर हल्ला केला.

OMG: Now the dog bites in the private part of Zomato delivery boy, blood was coming out of the pants..viral
धक्कादायक Video !, लिफ्टमधून बाहेर पडताच तो कळवळत होता...  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • पाळीव कुत्रा चावल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला
  • आता झोमॅटो डिलिव्हरी बॉयला लिफ्टमध्ये कुत्र्याने चावा घेतला
  • डिलिव्हरी बाॅयच्या पॅन्टीतून रक्त येत होते

नवी मुंबई : गाझियाबाद, नोएडामध्ये लिफ्टमध्ये पाळीव कुत्र्यांची दहशत पाहिल्यानंतर आता नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. येथे झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयला लिफ्टमधील कुत्र्याने चावा घेतला. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या तरुणाच्या प्रायव्हेट पार्टचा कुत्र्याने चावा घेतला आहे. त्यानंतर तरुणाच्या पँटमधून रक्त निघताना दिसत आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.(OMG: Now the dog bites in the private part of Zomato delivery boy, blood was coming out of the pants..viral)

अधिक वाचा : PitBull Attack : पिटबूल कुत्र्याने घेतल्या लहान मुलाचा चावा, चेहर्‍यावर पडले तब्बल दीडशे टाके

व्हिडिओमध्ये झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय लिफ्टमध्ये उभा असल्याचे दिसत आहे. दरम्यान लिफ्ट थांबते आणि तो बाहेर पडणार होता. तेव्हा लिफ्टच्या दरवाजाजवळ एक कुत्रा दिसला. कुत्र्याच्या गळ्यातला पट्टा कोणीतरी पकडला होता. मात्र, कॅमेऱ्यात त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नाही. यानंतर अचानक कुत्रा डिलिव्हरी बॉयवर तुटून पडतो. तो थेट डिलिव्हरी बॉयच्या प्रायव्हेट पार्टला चावतो.

यानंतर, डिलिव्हरी बॉय त्याच्या पॅंटमध्ये रक्त दाखवताना दिसत आहे आणि तो मोठ्याने रडतानाही दिसत आहे. या व्हिडीओमध्ये असेही दिसून येते की जेव्हा कुत्रा डिलिव्हरी बॉयला चावतो तेव्हा कुत्र्याचा मालक कोणत्याही प्रकारची सहानुभूती दाखवत नाही आणि थेट तेथून निघून जातो. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोक कुत्र्यांच्या मालकांवर संतापले आहेत.

सोशल मीडियावरील वापरकर्ते असे म्हणत आहेत की अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे, जे कुत्रे पाळतात परंतु त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. नुकतेच नोएडातील सेक्टर-75 मधील एका सोसायटीत लिफ्टमध्ये एका तरुणावर अचानक पाळीव कुत्र्याने हल्ला केला. कुत्रा त्याच्यावर इतक्या वेगाने तुटून पडला की त्याला काहीच समजले नाही आणि तो अचानक लिफ्टच्या कोपऱ्यात पडला. याशिवाय गाझियाबादमध्ये लिफ्टमध्ये एका मुलाला कुत्र्याने चावा घेतला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी