Viral video : हातपंपातून पाणी निघताना तुम्ही पाहिलं असेल, आता तुम्ही म्हणाल की यात नवीन काय आहे कारण हातपंपातून पाणी नाही तर काय बाहेर पडणार? तुम्हालाही असेच वाटत असेल तर आजचा व्हिडिओ पहा ज्यात पाण्यासोबत हातपंपातून आगही निघत आहे. पाहून विश्वास बसणं तसं अवघड आहे पण हे खरे आहे. हातपंपातून पाणी आले, नंतर आग विझली आणि नंतर पाणी आणि आग दोन्ही एकत्र येऊ लागले. (OMG! This hand pump sometimes throws water and sometimes fire, if you don't believe it, watch this video...)
अधिक वाचा ; लग्नापूर्वी गर्लफ्रेंड परीक्षेत नापास होताच बॉयफ्रेंडने केलं असं काही की...., ऐकल्यावर तुम्हालाही बसेल धक्का
हा व्हिडीओ मध्य प्रदेशातील बक्सवाह तालुक्यातील कचार गावातील आहे. येथे बुधवारी रात्री हातपंपाला आग लागल्याची विचित्र घटना घडल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. ते पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. यातील काही लोकांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो सध्या वेगाने व्हायरल होत आहे. आजूबाजूच्या परिसरात पिण्याच्या पाण्याचीही टंचाई असून हातपंपाला आग लागल्याचे ऐकून ते नाराज झाले आहेत.
कचर हे गाव जिल्हा मुख्यालयापासून १० किमी अंतरावर आहे. लोकांनी या घटनेची माहिती प्रशासनाला दिली असता, या घटनेच्या चौकशीनंतरच याबाबत काही सांगता येईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. काही स्थानिक लोक याला चमत्कारिक घटना म्हणत असले तरी काही जण केमिकलमुळे घडलेली घटना सांगत आहेत.