Viral Video: शिकारीसाठी सिंहीणीने केला हत्तीच्या पिल्लावर हल्ला, मग काय झाले पाहून तुम्हांला आश्चर्य वाटेल

एक जबदस्त व्हिडिओ  सोशल मीडियावर  व्हायरल होत आहे,  यात एका सिंहीणीने (Lioness)  शिकार करण्याच्या उद्देशाने हत्तीच्या पिल्लावर (Elephants) हल्ला केला.

one lioness tries to hunt an elephant to know what happened watch viral video
Viral Video: शिकारीसाठी सिंहीणीने केला हत्तीवर हल्ला, पण  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • जंगलात  (Forest)राहणाऱ्या वन्य प्राण्यांचे (Wild Animals) जीवन अगदी भिन्न आहे.
  • बर्‍याचदा जीव वाचवण्यासाठी एक प्राणी दुसर्‍या प्राण्याची शिकार करतो.
  • एक जबदस्त व्हिडिओ  सोशल मीडियावर  व्हायरल होत आहे,  यात एका सिंहीणीने (Lioness)  शिकार करण्याच्या उद्देशाने हत्तीच्या पिल्लावर (Elephants) हल्ला केला.

 Viral Video : जंगलात  (Forest)राहणाऱ्या वन्य प्राण्यांचे (Wild Animals) जीवन अगदी भिन्न आहे. येथे बर्‍याचदा जीव वाचवण्यासाठी एक प्राणी दुसर्‍या प्राण्याची शिकार करतो. केवळ लहान प्राणीच नाही तर मोठ्या प्राण्यांनाही त्यांच्या सुरक्षिततेची चिंता असते. दरम्यान,  एक जबदस्त व्हिडिओ  सोशल मीडियावर  व्हायरल होत आहे,  यात एका सिंहीणीने (Lioness)  शिकार करण्याच्या उद्देशाने हत्तीच्या पिल्लावर (Elephants) हल्ला केला.  पण छोट्या हत्तीशी पंगा घेणे सिंहीणीला महागात पडले.  हा व्हिडिओ ट्विटर यूजर नाझी-अल-तखिमने शेअर केला आहे आणि त्याच्याबरोबर असे कॅप्शन लिहिले आहे - एक सिंहीणी हत्तीची शिकार करण्याचा प्रयत्न करीत आहे.

 हा व्हिडिओ युजर्सला खूप आवडतो आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की  एक सिंहीण जंगलात हत्तीवर हल्ला करतेय. हत्तीच्या छोट्या पिल्लाची शिकार करण्याच्या उद्देशाने, सिंहीणीने त्याच्या पाठीवर उडी घेते. त्याला ठार करण्यासाठी पूर्ण ताकद लावते. दोघांमध्ये वर्चस्व मिळविण्याची लढाई बर्‍याच काळ सुरू राहते. आणि ही घटना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

महत्त्वाचे म्हणजे हत्तीच्या या छोट्या पिल्लाने सिंहीणीच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले  आहे. त्यातून आपला जीव वाचवण्यासाठी पूर्ण ताकद लावली. या दोघांच्या या भांडणात अखेर या छोट्याशी शूर हत्तीसमोर सिंहीण असहाय्य दिसली आहे.  आपला जीव वाचविण्यासाठी सिंहीणीला पळ कालावा लागला आहे.  व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी