Viral: आरारा खतरनाक! 'मजा नहीं आ रहा' असं लिहून सोडली नोकरी; हर्ष गोएंका म्हणाले... 

Unique Resignation Letter । आजच्या काळात प्रत्येकाला नोकरीत समाधानाची गरज आहे. याचा अर्थ प्रत्येकालाच नोकरीमध्ये सुख, शांती समाधान हवे आहे. याशिवाय वेळोवेळी प्रमोशन झाले पाहिजे.  

One person quit his job because he was not having fun
'मजा नहीं आ रहा' असं लिहून सोडली नोकरी   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आजच्या काळात प्रत्येकाला नोकरीत समाधानाची गरज आहे. -
  • 'मजा नहीं आ रहा' असं लिहून सोडली नोकरी.
  • उद्योगपती हर्ष गोएंका यांनी शेअर केला फोटो.

Unique Resignation Letter । मुंबई : आजच्या काळात प्रत्येकाला नोकरीत समाधानाची गरज आहे. याचा अर्थ प्रत्येकालाच नोकरीमध्ये सुख, शांती समाधान हवे आहे. याशिवाय वेळोवेळी प्रमोशन झाले पाहिजे. तसे झाले नाही तर लोक नोकरी सोडून इतर ठिकाणी नोकरी बघतात. त्याचबरोबर ज्या लोकांना नोकरीत आनंद, समाधान मिळत नाही, ते इतके अस्वस्थ होतात की ते डिप्रेशनमध्ये जातात. खूप कमी लोक आहेत जे समाधानी नसल्यामुळे नोकरी सोडून जातात. (One person quit his job because he was not having fun). 

अधिक वाचा : राज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मतदान करणार पण...

काही वेळा कामाच्या ठिकाणावरील दबाव इतका वाढतो की, एखाद्या व्यक्तीला नोकरी सोडावी लागते. सध्या सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक राजीनामा देणारे पत्र आहे. एका व्यक्तीने आपल्याला आनंद होत नसल्याचे थेट पत्राद्वारे लिहून नोकरीचा राजीनामा दिला आहे. दरम्यान उद्योगपती हर्ष गोएंका यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये राजेश नावाच्या व्यक्तीने राजीनामा दिल्याचे पाहायला मिळत आहे. 

हर्ष गोएंका यांनी शेअर केला फोटो

लक्षणीय बाब म्हणजे जेव्हा कोणी नोकरीचा राजीनामा देतो तेव्हा तो केवळ लिखित मेलमध्ये निश्चित केलेल्या पॅटर्नच्या आधारावर राजीनामा देतो. मात्र हर्ष गोएंका यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्या व्यक्तीने सहज लिहिले की, 'मजा नहीं आ रहा. हर्ष गोएंका यांनी शेअर केलेल्या राजीनाम्याच्या फोटोमध्ये राजेश नावाच्या व्यक्तीने आपण राजीनामा का देत आहोत हे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यांनी स्पष्ट लिहिले, 'प्रिय सर मला मजा येत नाही आहे. 

१८ जून रोजी हा राजीनामा देण्यात आला आहे. हा फोटो शेअर करत हर्ष गोएंका यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, "हे रिझाईन लेटर लहान आहे पण याचा अर्थ खूप खोल आहे. ही एक अतिशय गंभीर समस्या आहे, जी आपण सर्वांनी सोडवली पाहिजे. एकप्रकारे या पोस्टच्या माध्यमातून हर्ष गोएंका यांना कंपनीचे मालक आणि वरिष्ठ कर्मचाऱ्यांना काही धडा दिल्याचे चित्र आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी