अबब! लॉकडाऊन दरम्यान मांजरीच्या खोडसाळपणामुळे प्रेग्नेंट झाली महिला, नवरा पण थक्क

सोशल मीडियावर आपण प्राण्यांचे अनेक व्हिडिओ बघतो. मात्र आपला विश्वास बसणार नाही, असं काम एका मांजरीनं केलंय. तिच्या खोडसाळपणामुळे एक महिला गरोदर झालीय. जाणून घ्या काय घडलंय नेमकं...

Cat and Condom
लॉकडाऊनमध्ये मांजरीच्या खोडसाळपणामुळे प्रेग्नेंट झाली महिला 

थोडं पण कामाचं

  • मांजरीच्या खोडसाळपणामुळे पत्नी गर्भवती झाल्याचा पतीचा आरोप
  • जोडप्यानं केलं होतं फॅमिली प्लानिंग, नको होतं आत्ताच दुसरं मूल
  • मांजरीनं कंडोमला पाडले छिद्र, पत्नी झाली गर्भवती, पती थक्क

नवी दिल्ली: आपण सोशल मीडिया किंवा इंटरनेटवर (Internet) पाळीव प्राण्यांच्या (Pet Animals Video) मस्तीचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. शिवाय जंगलातील प्राण्यांचेही काही व्हिडिओ पाहून आपण आश्चर्यचकित झाले असाल. पण तुम्हाला माहितीय की, आपण आवड म्हणून ठेवलेले पाळीव प्राणी कधी-कधी आपल्या संकट आणणारे ठरू शकतात. हो अशीच एक घटना घडलीय, ज्यामुळे सर्वच जणांना धक्का बसलाय. एका पाळीव मांजरीच्या खोडसाळपणामुळे तिच्या घरातील लोकं संकटात सापडलेत. तर घडलं असं या बदमाश मांजरीनं घरात ठेवलेल्या कंडोम्समध्ये लहान-लहान छिद्र करून ठेवले होते, ज्यामुळे एका व्यक्तीची पत्नी गरोदर राहिलीय.

लॉकडाऊन दरम्यान घडली ही घटना

या व्यक्तीनं आपला अनुभर रॅडिडवर शेअर करत सांगितलं की, कशाप्रकारे त्यांच्या पाळीव मांजरीच्या खोळकरपणामुळे त्यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केलाय. त्या व्यक्तीनं लिहिलं, ‘आम्हा पती-पत्नीला कोरोना व्हायरसचं संकट संपेपर्यंत दुसरं बाळ नको होतं आणि पहिले आमचा एक बेबी बॉय आहे. माझी पत्नी प्रीक्लेम्पसियामुळे तणावपूर्ण गर्भावस्थेतून गेली होती. माझी मांजर टॉमला नेहमी कपाटात जावून खेळायची सवय आहे, एरव्ही ती स्वयंपाकघराच्या ओपन कॅबिनेटच्या दारावर खेळत असते.’

कपलनं केलं होतं हे प्लानिंग

त्या व्यक्तीनं पुढे लिहिलं, ‘आम्ही फॅमिली प्लानिंगसाठी कंडोमचा वापर करत होतो, कारण पिल्स घेतल्यानं महिलेला त्रास होत होता. पण मला ऐकून आश्चर्य वाटलं की, माझी पत्नी पुन्हा गर्भवती झाली होती. मला आश्चर्य वाटलं की, असं कसं घडलं? आमच्या पाळीव मांजरीनं कान साफ करायचे क्यू टिप्स फेकून दिले होते. तिथेच कंडोम पण ठेवलेले होते. काही आठवड्यांनी जेव्हा कळलं की, पत्नी गरोदर आहे तेव्हा मला कळलं की, यामागे मांजरीचा हात आहे.’

काय केलं मांजरीनं नेमकं?

मांजरीनं कपाट उघडून त्यात ठेवलेले कंडोम पंक्चर केले होते. जेव्हा त्या व्यक्तीनं कपाट उघडून त्यातील कंडोमचं पाकिट चेक केलं. तेव्हा त्याला त्यावर मांजरीच्या दातांचे मार्क्स दिसले आणि त्यात लहान लहान छिद्र पडले होते. मांजरीच्या एका चुकीमुळे या कपलला ठरवलं नसतांनाही बाळाच्या आगमनाची तयारी करावी लागतेय. कपल आता बाळाच्या स्वागताची तयारी करतंय. पण त्यासोबतच पत्नीच्या तब्येतीची काळजी घेत आहे. कारण त्यांचं पहिलं बाळ लहान आहे आणि पत्नीला प्रीक्लेम्पसियाचा त्रास असल्यामुळे तिची विशेष काळजी घ्यावी लागतेय. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी