OMG: आश्चर्यकारक! या महिलेच्या पोटात वाढतायत १३ मुले; डॉक्टरांनाही बसला धक्का

व्हायरल झालं जी
Updated Jun 21, 2022 | 14:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

Viral News In Marathi | या जगात कधी काही घडेल याची कोणीच कल्पना करू शकत नाही. तसेच काही अनोख्या गोष्टी घडलेल्या पाहायला मिळतात, ज्यांच्यावर विश्वास ठेवणे देखील कठीण असते.

one same time, 13 children are growing in the womb of this woman
आश्चर्यकारक! या महिलेच्या पोटात एकाचवेळी वाढतायत १३ मुले  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मेक्सिकोतून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे.
  • महिलेच्या पोटात एकाचवेळी वाढतायत १३ मुले.
  • या जोडप्यासमोर मुलांचे संगोपन करण्याचे मोठे आव्हान.

Viral News In Marathi | नवी दिल्ली : या जगात कधी काही घडेल याची कोणीच कल्पना करू शकत नाही. तसेच नेहमी काही अनोख्या गोष्टी घडलेल्या पाहायला मिळतात, ज्यांच्यावर विश्वास ठेवणे देखील कठीण असते. दरम्यान आज आपण अशाच एका प्रकरणाबद्दल भाष्य करणार आहोत. हे धक्कादायक प्रकरण मेक्सिकोमधून समोर आले आहे, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. कारण इथे एका महिलेच्या पोटात तब्बल १३ मुले एकत्र वाढत आहेत. तुमचाही यावर विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे. एवढेच नाही तर या खुलाशानंतर या जोडप्यासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. (one same time, 13 children are growing in the womb of this woman). 

अधिक वाचा : शिंदेसोबत सरकारला हादरे देणारी बंडखोर नेत्यांची यादी

महिलेला आधीच आहेत ६ मुले

'मिरर'ने दिलेल्या वृत्तानुसार, हे विचित्र प्रकरण इक्‍तपालुकाचे आहे. असे सांगितले जात आहे की अँटोनियो सोरियानो आणि मारित्झा हर्नांडेझ मेंडेझ पुन्हा एकदा पालक होणार आहेत. लक्षणीय बाब म्हणजे दोघांना आधीच ६ मुले आहेत आणि आता १३ मुले मारित्झा हर्नांडेझ मेंडेझच्या पोटात एकत्र वाढत आहेत. डॉक्टरांनी म्हटले की, त्यांच्या समोरचा मोठा प्रश्न या मुलांच्या संगोपनाचा आहे. कारण जर मेंडेझने १३ मुलांना जन्म दिला तर तिची एकूण मुले १९ होतील. माहितीनुसार, काउंसलर गेरार्डो गुरेरो यांनी लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. समुपदेशकाने सांगितले की प्रथम तुम्ही त्या व्यक्तीची ओळख पटवा आणि त्याला शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तो त्याच्या कुटुंबाचा खर्च उचलू शकेल.

गर्भातील सर्व मुलं ठीक आहेत 

मात्र एकाच वेळी इतक्या मुलांची प्रसूती होणे अत्यंत धोकादायक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतु गर्भातील सर्व बाळे पूर्णपणे ठिक आणि निरोगी आहे. परंतु अशा प्रकारची प्रकरणे फारच दुर्मिळ आहेत. आता लोक या कुटुंबाला कशी मदत करतात हे पाहणे बाकी आहे, कारण ही बाब खूप चर्चेचा विषय बनली आहे आणि सत्य जाणून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी