ऑनलाइन प्रेमाच्या गोष्टीने जिंकली हजारो मने, कोरोना काळात बदललं नशीब

कोरोना आणि लाॅकडाऊनच्या काळात कॅनडातील वृद्ध जोडपे ऑनलाइन भेटले. त्यांनी आता लग्न केले असून ते सोशल मिडियावर चांगेल व्हायरल होत आहे.

 Online love story won thousands of hearts, luck changed in Corona era
ऑनलाइन प्रेमाच्या गोष्टीने जिंकली हजारो मने, कोरोना काळात बदललं नशीब ।  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • कोरोनाच्या काळात दोघांची भेट एका डेटिंग अॅपवर झाली.
  • जिम अॅडम्स आणि ऑड्रे कॉट्स, ओटावाचे रहिवासी, सोशल मीडियाद्वारे भेटले.
  • दोघांच्या प्रेमाच्या गोष्टीची सर्वत्र चर्चा

मुंबई : असं म्हणतात की प्रेम आंधळ असतं त्याला वय नसतं, ते कधी, कुठे आणि कोणासोबत घडतं याबद्दल काहीच सांगता येत नाही. काही प्रेमकथा लोकांच्या मनात स्थिरावतात. तर, काहींबद्दल जाणून घेणे देखील आश्चर्यकारक आहे. पण, अशाच एका प्रेमकथेचे प्रकरण कॅनडामधून समोर आले आहे जे चर्चेचा विषय आहे. एवढेच नाही तर लोक या प्रेमकथेची चर्चा करत आहेत. वास्तविक, कोरोनाच्या काळात एक वृद्ध जोडपे प्रेमात पडले आणि आता दोघांनी लग्न केले आहे. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर चला, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण काय आहे? (Online love story won thousands of hearts, luck changed in Corona era)

मिळालेल्या माहितीनुसार, ओटावा येथील रहिवासी जिम अॅडम्स आणि ऑड्रे काऊट्स यांची सोशल मीडियाद्वारे भेट झाली. कोरोनाच्या काळात दोघांची भेट एका डेटिंग अॅपवर झाली. दोघांमध्ये सुमारे आठ महिने चॅटिंग सुरू होते. दोघांमध्ये खूप जवळीक निर्माण झाली आणि ते एकमेकांना पसंत करू लागले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 25 सप्टेंबर रोजी दोघांचे लग्न झाले. आता दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोक या जोडप्याला खूप लाईक करीत आहेत आणि अभिनंदन करत आहेत.

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 78 वर्षीय अॅडम्स यांच्या पत्नीचे 2017 मध्ये निधन झाले. दोघांचा संसार 38 वर्षे टिकला. तर  सुमारे 33 वर्षांपूर्वी, ऑड्रेने तिच्या पतीपासून घटस्फोट घेतला. दोघेही बराच काळ एकटे आयुष्य जगत होते. पण, कोरोना काळात, दोघांचे एकटेपण दूर झाले आणि आता दोघांनी सुखी जीवन सुरू केले आहे. या दोघांचा फोटो जिमचा मुलगा जेजे अॅडम्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लाखो लोकांनी ही पोस्ट लाईक केली आहे आणि सातत्याने कमेंट करत आहेत. तर तुम्हाला ही प्रेमकथा कशी आवडली, कमेंट करून नक्की सांगा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी