Optical Illusion: करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी वाघ टप्प्यात येऊन बसलाय, पण तुम्हाला दिसतोय का?

Optical Illusion: या चित्रात एक वाघ आपल्या शिकारीवर टपून बसला आहे. आपली शिकार टप्प्यात येताच त्याचा फडशा पाडण्यासाठी तो सज्ज झाला आहे. मात्र या वाघ नेमका आहे कुठे ते तुम्हीच शोधून काढा

optical illusion a dreaded tiger is ambushed in bush if you have an eagle eye then find it
करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी वाघ टप्प्यात येऊन बसलाय, पण..  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • एक भयानक वाघ जंगलात लपला आहे
  • वाघ शोधताना लोकांची झाली पुरेवाट
  • वाघ पाहत आहे भक्ष्याची वाट

Optical Illusion: ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित अनेक फोटो किंवा चित्र आपल्याला पाहायला मिळतात.  खरं तर हे फोटो म्हणजे एक प्रकारे डोळ्यांची फसवणूक आहे असं आपल्याला. पण या फोटो किंवा चित्रांमध्ये अशी काही कोडी दडलेली असतात ती आपल्या मेंदूला प्रचंड चालना देतात. बऱ्याच लोकांना वाटतं की त्यांची दृष्टी ही गरुडासारखी तीक्ष्ण आहे. पण तरीही ही कोडी (Optical Illusion) सोडविण्यात ते अपयशी ठरतात. (optical illusion a dreaded tiger is ambushed in bush if you have an eagle eye then find it)

आता असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो अनेकांना यामधील कोडं शोधून काढण्यासाठी एक प्रकारचं आव्हान देत आहे. या चित्रात एक वाघ हा शिकार मिळविण्यासाठी अगदी टपून बसला आहे. आपलं भक्ष्य पकडण्यासाठी हा योग्य टप्प्यात आणि समोरच बसला आहे, मात्र तरीही या जंगलातील फोटोमध्ये वाघ सहजासहजी काही दिसत नाही. अनेक जण फोटोमध्ये वाघाला शोधण्याचा बराच प्रयत्न करत आहे. पण अनेक जण त्यात अपयश ठरले आहेत.

अधिक वाचा: Viral News : महाकाय अजगरानं 54 वर्षाच्या महिलेला दोन तासात गिळलं, अजगराचं पोट फाडून काढला मृतदेह

गोंधळात टाकणारा फोटो

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो पाहून अनेक जण चक्रावून गेले आहेत. कारण फोटोमध्ये वाघ लपला असला तरी तो लोकांना सहजासहजी दिसत नाही. या वाघाचा शोध घेण्यासाठी लोकांना खूप प्रयत्न करावे लागत आहेत. या फोटोमध्ये तुम्हाला फक्त हिरवी झाडी आणि दाट जंगल पाहायला मिळत आहेत. पण, आपण काळजीपूर्वक पाहिल्यास, आपल्याला झाडं आणि जंगलामध्ये लपलेला वाघ दिसेल. जर तुम्ही हे आव्हान स्वीकारत असाल तर वाघ नेमका कुठे लपलाय ते शोधून दाखवा.

फोटोतील वाघ शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त 10 सेकंदांचा अवधी असणार आहे. याच 10 सेकंदात तुम्हाला जंगलामध्ये लपलेला वाघ शोधायचा आहे. 

अधिक वाचा: Emotional Video: सात वर्षांच्या मुलीनं पहिल्यांदाच ऐकला आवाज, कानात मशीन लावताच डोळ्यात आले अश्रू

tauseef_traveller नावाच्या इंस्टाग्राम पेजवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या इंस्टाग्राम अकाउंटवर यूजरने एकूण  4 फोटो शेअर केले आहेत. यासोबत युजरने कॅप्शनमध्ये विचारले आहे की, '1, 2, 3 किंवा 4 पैकी तुम्हाला वाघ कोणत्या फ्रेममध्ये दिसतोय?' 

खरं म्हणजे हे चार फोटो काढण्यासाठी आणि वाघाची छबी कॅमेऱ्यात टिपण्यासाठी फोटोग्राफरला तब्बल तासभर वाट पाहावी लागली.

आता तुम्ही सांगा की, तुम्हाला वाघ नेमका कोणत्या स्लाइडमध्ये दिसला. जर तुम्हाला पहिल्या स्लाइडमध्ये वाघ दिसला तर तुमची दृष्टी खरोखरच गरुडासारखी तीक्ष्ण खूप तीक्ष्ण आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी