Optical Illusion: या फोटोमध्ये लपले आहे फुलपाखरु, ३० सेकंदात दाखवा शोधून

सध्या सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्युजनचे फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो मनाला गोंधळात टाकणारे असतात. या फोटोंमध्ये प्राणी, पक्षी, वस्तू किंवा मानवी चेहरे लपलेले असतात. आता असाच एक फोटो व्हायरल होत असून त्यात एक फुलपाखरु लपलेले आहे.

optical illusion
ऑप्टिकल इल्युजन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्युजनचे फोटो व्हायरल होत असतात.
  • हे फोटो मनाला गोंधळात टाकणारे असतात.
  • आता असाच एक फोटो व्हायरल होत असून त्यात एक फुलपाखरु लपलेले आहे.

Optical illusion : सध्या सोशल मीडियावर (Social Media) अनेक ऑप्टिकल इल्युजनचे (optical illusion) फोटो व्हायरल (photo viral) होत असतात. हे फोटो मनाला गोंधळात टाकणारे असतात. या फोटोंमध्ये प्राणी, पक्षी, वस्तू किंवा मानवी चेहरे लपलेले असतात. आता असाच एक फोटो व्हायरल होत असून त्यात एक फुलपाखरु लपलेले आहे. या फोटोमध्ये कोल्हा, रकून आणि अस्वलाचे पिल्लूही आहे. परंतु अवघ्या ३० सेकंदात तुम्हाला यातील फुलपाखरु शोधून दाखवायचे आहे. (Optical Illusion find butterfly in this photo in just 30 second challenge gone viral)

अधिक वाचा :  Optical Illusion: हे चित्र पाहून नका बनू उल्लू; 5 सेकंदात शोधून दाखवा खरी घुबड, सापडली तर तुम्ही आहात स्मार्ट

३० सेकंदात शोधा फुलपाखरू

फुलपाखरू शोधण्यापूर्वी आपल्या मोबाईलमध्ये ३० सेकंदाचा टाईमर लावा. जर तुम्ही ३० सेकंदात फुलपाखरु शोधले तर तुम्ही खरंच खुप हुशार आहात. या फोटोमध्ये लपून बसलेले फुलपाखरु शोधणे सोपे नाही, हे फुलपाखरु शोधताना भल्या भल्यांना घाम फुटला आहे.

अधिक वाचा :  Optical Illusion: समुद्रामध्ये लपली आहे मगर, १० सेकंदात दाखवा शोधून, भले भलेही झाले फेल

एकदा वरच्या बाजूने शोधा

जर तुम्हाला फोटोत फुलपाखरु सापडत नसेल तर एकदा वरच्या बाजूला पहा. जर तुम्ही फोटो निरखून पाहिला तर कदाचित तुम्हाला ते फुलपाखरु दिसेल. जर ३० सेकंदानंतरही तुम्हाला यातील फुलपाखरु सापडले नसेल तर काळजी करू नका. तुमच्यासाठी आम्ही खालील फोटो पोस्ट करत आहोत त्यात तुम्हाला फुलपाखरु दिसेल.  

अधिक वाचा : Optical Illusion: खेळण्यांमध्ये लपला आहे खरा घुबड, शोधून दाखवा ५ सेकंदात

लोक झाले हैराण

या फोटोतील फुलपाखरु फार कमी जणांना सापडले आहे. फुलपाखरु शोधत शोधत लोक हैराण झाले होते. जगातील एक टक्के लोकच फक्त ऑप्टिकल इल्युजनचा चॅलेंज पूर्ण करू शकतात. जर तुम्ही हे चॅलेंज पूर्ण केले असेल तर तुमची गणना जगातील एक टक्के हुशार लोकांमध्ये होईल. आपल्या मित्र मैत्रिणींना तसेच नातेवाईकांना हा फोटो पाठवा आणि त्यातील फुलपाखरु ३० सेकंदात शोधून दाखवा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी