Optical Illusion: सोशल मीडियावर सध्या ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. ऑप्टिकल इल्युजन म्हणजे मनाला गोंधळात टाकणारे हे फोटो असतात. अनेकवेळेला या फोटोंमध्ये प्राणी, पक्षी, वस्तू किंवा मानवी चेहरे लपलेले असतात, अवघ्या काही सेकंदात हे ते शोधण्याचे चॅलेंज दिले जाते. लोकं डोकं खाजवत राहतात परंतु हे चॅलेंज त्यांना पूर्ण करता येत नाही. जगातील फक्त एक टक्के लोक अशा प्रकारचे चॅलेंज पूर्ण करतात. आता असाच एक ऑप्टिकल इल्युजनचा फोटो व्हायरल होत आहे. घोडा हा चार पायांचा प्राणी असतो, परंतु या फोटोमध्ये तीन पायांचे घोडे लपले आहेत. अवघ्या १० सेकंदात हे घोडे शोधण्याचे चॅलेंज दिले जात आहे.
या दिलेल्या फोटोमध्ये तुम्हाला खुप सारे घोडे दिसत असतील. परंतु तीन पाय असलेले घोडे तुम्हाला शोधायचे आहेत. फक्त तीन पायांचे घोडे शोधायचे नसून १० सेकंदात हे चॅलेंज पूर्ण करायचे आहे. भल्या भल्यांना हे चॅलेंज पूर्ण करताना घाम फुटला आहे. कारण इतर घोडे आणि या तीन घोड्यांमध्ये इतके साम्य आहे की ते पटकन लक्षातच येत नाही.
अधिक वाचा : Optical Illusion: समुद्रामध्ये लपली आहे मगर, १० सेकंदात दाखवा शोधून, भले भलेही झाले फेल
हा फोतो एकदा निरखून पहा, यात तीन पायाचा एक घोडा नसून अनेक घोडे हे तीन पायाचे आहेत. तीन पायाचे एकूण किती घोडे आहेत ते तुम्हाला शोधून काढायचे आहे फक्त शोधून काढायचे नसून अवघ्या १० सेकंदात हे चॅलेंज पूर्ण करायचे आहे.
अधिक वाचा : Optical Illusion: तुम्ही या चित्रात 10 सेकंदात हरण शोधू शकतात का, फक्त 3 टक्के लोक पास
जर तुम्ही हे चॅलेंज पूर्ण केले असेल तर तुमची गणना जगातील हुशार लोकांमध्ये होईल. आणि जरी तुम्ही हे चॅलेंज पूर्ण केले नसेल तर काळजी नसावी. यासाठी आम्ही उत्तर खाली पोस्ट करत आहोत. जिथे जिथे तीन पायांचे घोडे आहेत तिथे लाल रंगाने दाखवण्यात आले आहे. हा फोटो तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना पाठवा आणि हे चॅलेंज १० सेकंदात पूर्ण करण्याचे चॅलेंज द्या.