Optical illusion of black chair: सोशल मीडियात Optical illusion चे अनेक फोटो आणि व्हिडिओज समोर येत आहेत. हे फोटो किंवा व्हिडिओ आपल्या नजरेला एक प्रकारे चकवाच देत असतात. मात्र, व्यवस्थित पाहिलं तर त्यामागचं उत्तर आणि हे कोड सोडवण्यास मदत होते. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासमोर आणला आहे. या फोटोत एक काळ्या रंगाची खुर्ची दिसत आहे आणि त्या खुर्चीवर बसण्यासाठी तुम्ही कोणत्या दिशेने जाल याच उत्तर द्यायचं आहे. सात सेकंदात याचं उत्तर देण्यात अनेकांना अपयश आलं आहे. पाहा तुम्हाला याचं उत्तर मिळतं का?
एका खोलीच्या मध्यभागी एक खुर्ची ठेवली आहे. ही खुर्ची काळ्या रंगाची आहे. तुम्हाला हा फोटो पाहून अवघ्या सात सेकंदात याचं उत्तर द्यायचं आहे की, खुर्चीवर बसण्यासाठी तुम्ही कोणत्या दिशेने जाल.
व्यवस्थित आणि नीट पाहा जर तुम्हाला या खुर्चीवर बसायचे असेलतर तुम्हाला कोणत्या दिशेने जावे लागेल याचा अंदाज वर्तवा.
हिंट
आम्ही तुम्हाला एक हिंट देतो, ही खुर्ची एकतर डावीकडे किंवा उजवीकडे अशा स्थितीत आहे.
हा फोटो पाहिल्यानंतर तुमच्या डोक्यात पहिला विचार येईल की, ही खुर्ची समोरच्या दिशेला म्हणजेच कॅमेऱ्याच्या दिशेने ठेवली आहे. मात्र, हा एक भ्रम आहे. या Optical illusion चं उत्तर एका GIF द्वारे देण्यात आलं आहे.
हे पण वाचा : गर्लफ्रेंडच्या धूर्तपणाला कंटाळून प्रियकराने केले ब्रेकअप, पत्रात लिहंल... मोठा भाऊ म्हणून माफ कर!
GIF फाईलमध्ये दाखवण्यात आले आहे की, एक व्यक्ती चालत येतो आणि खुर्चीवर बसतो. हे पाहिल्यावर नेटिझन्सला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं.
जेव्हा खुर्ची तुमच्या दिशेने असते तेव्हा ती कशी दिसते:
आता तुम्ही विचार करत असाल की, हे सर्व कसं शक्य आहे. तर ही खुर्ची जाणूनबुजून तशा प्रकारे डिझाईन केली आहे. जे पाहताच सर्वजण संभ्रमात पडतात. याशिवाय तुम्ही एका कोपऱ्यातून पाहता तेव्हा तुम्ही फसतात कारण हे फोटोज क्लासिक डिझाइनसारखे असतात.