Optical Illusion: सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये मनुष्य, प्राणी, वस्तू असे काही ना काही लपलेले असते. या फोटोंमध्ये प्राणी, वस्तू, मनुष्य शोधून दाखवण्याचे चॅलेंज दिले जाते. तुम्हा या फोटोमध्ये फक्त हे वस्तू, प्राणी शोधण्याचे नसतात. तर कमीत कमी वेळेत हे शोधून दाखवण्याचे एक आव्हान असते. काहींना हा सोशल मीडियावरील आणखी एक टाईमपास वाटत असेल. पण यामुळे तुमची बुद्धी आणि नजर किती शार्प आहे हे कळतं.
ऑप्टिकल इल्युजन म्हणजे मनाला गोंधळात टाकणारे हे फोटो असतात. आपल्या डोळ्यांना पटकन दिसेल असेल असे काही या फोटोमध्ये नसतं. त्यासाठी हे फोटो निरखून पहायचे असतात. आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. त्यात एक दोन नव्हे तर १३ चेहरे लपलेले आहेत. तुम्ही हा फोटो पहा आणि तुम्हाला किती चेहरे दिसतात हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा.
बेव डूलिटल यांनी हा ऑप्टिकल इल्युजनचा फोटो तयार केला आहे. यात १३ चेहरे दडलेले असून या फोटोला द फॉरेस्ट हॅस आईज (The Forest Has Eyes) म्हणजेच जंगलाला असलेले डोळे असे शीर्षक देण्यात आले आहे.
आता खालील फोटो पाहुयात त्यात या फोटोत चार चेहरे सहज दिसत आहेत. हे चार चेहरे तुम्हाला लगेच सापडतील कारण आपली नजर त्यांच्यावर पटकन जाते. हे चेहरे मोठे आहेत आणि फोटोच्या बरोबर केंद्रस्थानी आहेत.
फोटो जरा तुम्ही निरखून पाहिला तर तुम्हाला कळेल डाव्या खडकाजवळ दोन चेहरे आहेत. एक मोठा चेहरा तुम्हाला पटक दिसेल. उजव्या बाजूलाही गवतात एक चेहरा तुम्हाला दिसेल. हा चेहरा छोटा असल्याने लवकर निदर्शनास पडला नाही.
वर झाडांमध्ये चार चेहरे पटक दिसत नाहीत. परंतू व्यवस्थित पाहिल्याने या चेहर्यातील डोळे, नाक आणि ओठ दिसतील.
सर्वात कठीण तीन चेहरे जे पटकन दिसत नाहीत. हे चेहरे झाडांच्या फांद्यांमध्ये लपलेले आहेत. तुम्हाला पटकन सापडणार नसतील तर आम्ही तुमच्यासाठी खाली हा फोटो देत आहोत. हे चॅलेंज तुमच्या मित्र मैत्रीणीला आणि नातेवाईकांना पाठवा आणि यातील १३ चेहरे शोधण्याचे चॅलेंज द्या.