Optical Illusion : फोटोत तुम्हाला अगोदर काय दिसलं? पुरुषाचा पाय की महिलेचा? उत्तरच ठरवेल तुमचं संवाद कौशल्य

या फोटोकडे पाहिल्यावर तुम्हाला सर्वप्रथम काय दिसलं, याचा विचार करा. महिलेचा पाय दिसला की पुरुषांचा?

Optical Illusion
फोटोत तुम्हाला अगोदर काय दिसलं?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • या फोटोत सर्वप्रथम तुम्हाला काय दिसलं?
  • या प्रश्नाचं उत्तरच सांगेल तुमचा खरा स्वभाव
  • तुम्ही महिलेचा पाय पाहिला की पुरुषाचा?

Optical Illusion : गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर (Social media) ऑप्टिकल इल्यूजनशी (Optical illusion) संबंधित अनेक फोटो व्हायरल (Viral photo) होत आहेत. काही ऑप्टिकल इल्युजन अशी असतात, ज्यावरून आपल्याला आपल्या व्यक्तीमत्त्वाचा (Personality) अंदाज घेता येणं शक्य होतं. या प्रकाराला ‘पर्सनॅलिटी ऑप्टिकल इल्युजन’ असं (Personality optical illusion) म्हटलं जातं. तुमचा स्वभाव आणि तुमचं व्यक्तीमत्व याबाबत अनेक खास गोष्टी ऑप्टिकल इल्युजनच्या माध्यमातून प्रकाशात येऊ शकतात. एखादी व्यक्ती एखाद्या फोटोकडे कसं पाहते, त्यातील कुठला भाग तिच्या नजरेत सर्वप्रथम भरतो, यावरून त्या व्यक्तीचा दृष्टीकोन काय आहे, हे साधारणपणे दिसून येतं. त्यासाठी अनेकदा ऑप्टिकल इल्युजनचा वापर करून अनेकांचा स्वभाव ओळखायलाही मदत होते.

पायाचा फोटो

सोशल मीडियावर सध्या या पायाच्या फोटोची जोरदार चर्चा आहे. या फोटोत पाय दिसतात, याबद्दल कुणाचंच दुमत नाही. मात्र यात दोन प्रकारचे पाय आहेत. एक आहे महिलेचा पाय. पांढऱ्या रंगाचे पाय आणि बॅकग्राउंडला काळा रंग असं त्याचं स्वरुप आहे. तर दुसरा आहे काळ्या ट्राउजरमधला पाय आणि बॅकग्राउंडला दिसणारा पांढरा रंग. महिलेचा पाय वरून खाली येतो आणि खालच्या बाजूला पायाची पावलं आणि शूज दिसतात. तर पुरुषांचा पाय हा खालून वर रेखाटण्यात आला असून वरच्या बाजूला शूज घातल्याचं दिसतं. काही वेळ हा फोटो नीट पाहिल्यावर दोन्ही प्रकारचे पाय प्रत्येकाला दिसू शकतात. मात्र हा फोटो पाहिल्या पाहिल्या पहिल्यांदा कुठला पाय दिसला, त्यावरून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो.

तुम्हाला महिलेचा पाय दिसला का?

जर तुम्हाला सर्वप्रथम महिलेचा पाय दिसला असेल तर तुम्ही खूप विचार करून बोलणाऱ्या व्यक्ती आहात. आपण बोलत असलेल्या कुठल्याही गोष्टीचा समोरच्याच्या मनावर काय परिणाम होईल, याचा विचार करूनच तुम्ही कुठलीही गोष्ट बोलता. अनेकदा काही बोलायचं मनात असूनही त्याला तुम्ही आवर घालता. बोलण्यापेक्षा संबंध टिकवून ठेवणं आणि कुणालाही न दुखावणं ही बाब तुम्हाला अधिक महत्त्वाची वाटते. अनेकदा तुमच्या स्वभावामुळे ज्या गोष्टी बोलण्याची गरज आहे, त्यादेखील तुम्ही बोलत नाही. त्यामुळे योग्य त्या गोष्टी योग्य त्या वेळत बोलणं गरजेचं आहे, हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. अन्यथा तुमची मानसिक मुस्कटदाबी तुम्ही स्वतःच करत राहाल. 

अधिक वाचा - बायको नांदायला येत नसल्यानं शंभर फुट उंच मोबाईल टॉवरवर चढला दारुड्या गणपत, लोकांना आली शोलेची आठवण

तुम्हाला पुरुषाचा पाय दिसला का?

तुम्हाला या फोटोत जर सर्वप्रथम पुरुषाचा पाय दिसला असेल, तर तुम्ही स्पष्टवक्ते आणि जे मनात असेल ते बोलून दाखवणारे आहात. तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलताना त्याला काय वाटेल, याचा विचार करत नाही. तुमचे विचार आणि तुमच्या भावना मांडण्यापासून तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही. तुम्ही कधीच तुमचे विचार दाबून ठेवत नाही. मात्र समोरच्या व्यक्तीसोबतचे संबंध त्यामुळे तुटण्याची शक्यता असते. प्रत्येकजण तुमच्यासारखा स्पष्टवक्ता असेल, असं नाही. 

अधिक वाचा - ऐकावे ते नवलचं..., विमानाच्या ‘कुइझिन’मध्ये खायला मिळाले सापाचे मुंडके, प्रवाशांमध्ये एकच खळबळ

दोन्ही पाय एकत्र

जर तुम्हाला दोन्ही पाय एकत्रच दिसले, तर मात्र तुम्ही बोलण्याआधी कुठलाही विचार करत नाही. तुमचे विचार पक्के असतात आणि ते मांडायला तुम्ही अजिबात घाबरत नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी