Optical Illusion Image: मुंबई : ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच डोळ्यांना धोका देणारे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे फोटो पाहिल्यावर बुद्धी भ्रमित होते आणि या फोटोत आपल्याला जे दिसतं त्यामुळे आपण गोंधळून जातो. असाच एक फोटो व्हायरल होत आहे आणि त्यामुळे नेटकरी गोंधळात पडले आहेत. काहींना हा फोटो सुंदर वाटतो पण या फोटोमागील सत्य जाणून तुम्हीही विचारात पडाल.
हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका गायिकेने हा फोटो बनवला आहे. हा फोटो सुप्रसिद्ध गायिका एडेल हिचा आहे. खुद्द एडेलने हा फोटो बनवला आहे. एखाद्या सेलिब्रिटीने अशा प्रकारे फोटो बनवण्याची ही पहिलीच वेळ असावी. आपल्या गाण्याच्या ऍल्बमसाठी एडेलने हा फोटो बनवला आहे. हा फोटो पाहून एडेलचे चाहते गोंधळात पडले आहेत.
या फोटोमध्ये काहीतरी गौडबंगाल
या फोटोमध्ये तुम्हाला एक सुंदर महिला दिसत असेल. तिचे डोळेही या फोटोमध्ये खुप सुंदर आहेत. तिचे डोळे पाहून अनेकजण या फोटोच्या प्रेमात पडले आहेत परंतु हा फोटो निरखून पाहिल्यास तुम्हाला त्यात काहीतरी विचित्र दिसेल. या फोटोमध्ये काही विचित्र गोष्टी तुम्हाला जाणवतील. जर तुम्ही हा फोटो व्यवस्थित पाहिला तर जाणवेल काही तरी यात वेगळे आहे. जर तुम्हाला कळाले नसेल तर या महिलेचे डोळे जरा निरखून पहा. या फोटोमध्ये तुम्हाला काही गौडबंगाल दिसेल.
डोळ्यांना काजळ लावले आहे, परंतु फोटोमध्ये डोळे उलटे असल्याचे तुम्हाला दिसेल. तुम्ही हा फोटो व्यवस्थित पाहिला तर कळेल की चेहर्यावरील नाक आणि भुवया वेगळ्याच दिशेला आहेत. सुप्रसिद्ध गायिका एडेल यांच्या गाण्याच्या ऍल्बमवर हा फोटो उल्टा लावलेला आहे. जेव्हा तुम्हाला या फोटोची खरी गोष्ट कळेल तेव्हा तुम्ही हरखून जाल. आपल्य वाचकांसाठी आम्ही हा फोटो उल्टा टाकला होता, हा फोटो पाहून तुम्ही विचारात पडाल.