१९ वर्षाच्या मुलीकडून वडिलांना यकृत दान, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

व्हायरल झालं जी
Updated Apr 21, 2019 | 16:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

कोलकत्तामधल्या 19 वर्षाच्या मुलीनं खूप कौतुकास्पद काम केलं आहे. तिनं आपल्या वडिलांसोबत शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकं काय केलं आहे त्या मुलीनं जाणून घेऊया.

Rekha datta
१९ वर्षाच्या मुलीकडून वडिलांना यकृत दान, सोशल मीडियावर फोटो व्हायरल  |  फोटो सौजन्य: Facebook

Organ donate: बाप आणि लेक हे नातं सर्व नात्यापेक्षा वेगळं असतं. बाप आणि लेकीमधलं प्रेम याची तुलनाचं करू शकत नाही. आपण दरवेळी बापानं लेकीचे प्राण वाचवले, बापानं मुलीसाठी असं केलं ते केलं असं ऐकत आलो आहे. पण आज मात्र थोडा वेगळा किस्सा समोर आला आहे. तुम्ही वडिलांनी मुलीला यकृत दान केलं किंवा किडनी दान केली, आईनं मुलाला किडनी दान केली अशा घटना बऱ्याचदा ऐकल्या आणि वाचल्या देखील असाल. पण कधी मुलीनं आपल्या बापाला यकृत दान केल्याचं ऐकलं आहे का ? हो अशीच एक घटना कोलकत्तामध्ये घडली आहे.  १९ वर्षांच्या मुलीनं आपल्या बापाला यकृत दान केलं आहे. 

बिजनेसमन हर्ष गोयंकानं काही दिवसांपूर्वी आपल्या ट्विटर हॅडलवर एका मुलीचा तिच्या वडिलांसोबतचा फोटो शेअर केला होता. या फोटोसोबत हर्ष यांनी फोटोमागची घटना सांगितली आहे.  कोलकत्तामधली १९ वर्षांची एक मुलगी आहे जिचं नाव राखी दत्ता आहे. राखीनं आपल्या वडिलांना यकृताचा त्रास सुरू होता म्हणून तिनं वडिलांना यकृताचा ६५ टक्के भाग दान केला. 

 

 

१९ वर्षांच्या मुलीनं आपल्या वडिलांसाठी केलेल्या कामाबद्दल सोशल मीडियावर तिचं कौतुक केलं जातं आहे. या फोटोमध्ये वडिल आणि राखीच्या सर्जरीच्या खुणा दिसताहेत. राखीनं वडिलांसोबत सर्जरीच्या खुणा दाखवत फोटो क्लिक केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. १९ वर्षांच्या राखीचं सगळेचजण कौतुक करत आहेत. 

 

 

गोयंका यांनी राखी आणि तिच्या वडिलांचा फोटो शेअर केला आणि लिहिलं की, १९ वर्षांची राखीनं आपल्या यकृताचा ६५ टक्के भाग आपल्या वडिलांना दान केला. ज्यांना यकृताच्या गंभीर आजार झाला होता. या मुलीनं खूप हिंमतीचं काम केलं आहे.

 

 

 

 

कोणाताही भविष्याचा विचार न करता, कोणत्याही वेदना, कोणत्याही खुणा याचा जराही विचार न करता या मुलीनं हिंमतीचं पाऊल उचललं. एका मुलीचं आपल्या वडिलांवर असलेलं प्रेम नेहमीचं खूप खास असतं. हे एक उत्तम उदाहरण आहे की, जिथे मुलींचं प्रमाण खूप कमी आहे. गोयंका यांचं ट्विट ५ हजार हून जास्त लोकांनी रिट्विट केलं आणि २२ हजार हून जास्त लोकांनी लाईक्स केलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
१९ वर्षाच्या मुलीकडून वडिलांना यकृत दान, सोशल मीडियावर फोटो व्हायरल Description: कोलकत्तामधल्या 19 वर्षाच्या मुलीनं खूप कौतुकास्पद काम केलं आहे. तिनं आपल्या वडिलांसोबत शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकं काय केलं आहे त्या मुलीनं जाणून घेऊया.
Loading...
Loading...
Loading...