आफ्रिकेतील 'ओसामा' मगरीने फस्त केली ८० माणसे, व्हिक्टोरिया सरोवराकाठच्या खतरनाक मगरीची कथा

Osama Crocodile:'ओसामा' माणूस नसून एक मगरमछ आहे. ही मगर आकाराने विशाल आणि अत्यंत आक्रमक आहे. 'ओसामा' या मगरीने आतापर्यत ८० माणसांना फस्त केले आहे आणि अनेक शर्थीच्या प्रयत्नानंतरही ही मगर मारण्यात अपयश आले आहे.

Osama Crocodile in Uganda
युगांडामधील ओसामा मगरमछ 

थोडं पण कामाचं

  • ओसामामुळे वाहिले रक्ताचे पाट, ८० लोक मगरीच्या पोटात गायब
  • असे पडले मगरीचे नाव ओसामा
  • ५० गावकरी आणि असा पकडला गेला ओसामा

नवी दिल्ली : अमेरिकेत ९/११ दहशतवादी हल्ला घडवून शेकडो नागरिकांना ठार मारणारा अल कायदाचा म्होरक्या आणि जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनचे (Osama Bin Laden) नाव घेताच आजही अनेकांच्या अंगावर काटा येतो. मात्र 'ओसामा' हे नाव फक्त या कुख्यात दहशतवाद्याचेच नाही तर जगात आणखी एक 'ओसामा' आहे ज्याच्या थैमानामुळे एक देश हैराण झाला आहे. हा 'ओसामा' माणूस नसून एक मगरमछ (Osama Crocodile) आहे. ही मगर ( Crocodile)आकाराने विशाल आणि अत्यंत आक्रमक आहे. 'ओसामा' या मगरीने आतापर्यत ८० माणसांना फस्त केले आहे आणि अनेक शर्थीच्या प्रयत्नानंतरही ही मगर मारण्यात अपयश आले आहे. युगांडा (Uganda) या आफ्रिकेतील (Africa) एका देशातील 'ओसामा' या नावाने कुप्रसिद्ध असलेली या मगरीचे नाव ऐकताच अनेकांच्या छातीत धडकी भरते. स्थानिकांना वाटते की त्या मगरीमध्ये ओसामा बिन लादेनची आत्मा आहे. याच कारणामुळे व्हिक्टोरिया सरोवराच्या (Lake Victoria) काठावर वसलेल्या लुगांगा गावातील लोक 'ओसामा'चे नाव काढताच थरथर कापू लागतात. जाणून घेऊया 'ओसामा' मगरीची पूर्ण कहाणी... (Osama Crocodile that killed more than 80 people on b=the bank of Lake Victoria in Uganda)

ओसामामुळे वाहिले रक्ताचे पाट, ८० लोक मगरीच्या पोटात गायब

एखादे असे गाव जे एखाद्या सुंदर सरोवराच्या काठावर वसलेले आहे. अशा गावात राहणे यापेक्षा सुंदर गोष्ट दुसरी असू शकत नाही. मात्र जर त्या सुंदर सरोवरात एक अत्यंत खतरनाक आणि विशालकाय मगरमछ राहात असेल तर त्या गावातील आणि त्या सरोवराच्या परिसरातील लोकांच्या मनात आनंदाची जागा भीती घेते. युगांडा या आफ्रिकेतील देशातील लुगांगा गावातील लोकांची हीच कथा आहे. युगांडातील व्हिक्टोरिया सरोवर आफ्रिकेतील सर्वात मोठे सरोवर आहे आणि संपूर्ण जगातील हे दुसऱ्या क्रमांकाचे सरोवर आहे. यावरूनच व्हिक्टोरिया सरोवराच्या विशालतेची तुम्हाला कल्पना यावी. मात्र अलीकडच्या काळात हे सरोवर एका कुख्यात बाबीसाठी प्रसिद्ध झाले आहे. व्हिक्टोरिया सरोवरात 'ओसामा' नावाची एक मगर राहते जी अत्ंयत हिंसक आणि खतरनाक आहे. प१९९१ पासून ते २००५ पर्यत ओसामा मगरीने या परिसरात अनेक माणसे फस्त केली आहेत. लुगांगा गावातील तर १/१० माणसे या मगरीने गिळंकृत केली आहेत. ओसामा मगरीच्या क्रूरपणाच्या कथा या परिसरातील अनेक गावात प्रसिद्ध आहेत. ओसामा मगर सरोवरात पाणी घेण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांना किंवा लहान मुलांना झडप घालून खाऊन टाकायची. इतकेच नाही तर सरोवरात मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना पलटवून आणि त्यांना बुडवून ओसामा मगर बोटीतील माणसांना खाऊन टाकायची.

असे पडले मगरीचे नाव ओसामा

या विशालकाय मगरीचा चलाखपणा, क्रुरपणा आणि अफाट क्षमता यामुळे गावकऱ्यांनी ओसाम बिन लादेनच्या नावावर मगरीला ओसामा हे नाव दिले. काही गावकऱ्यांना तर असेदेखील वाटते की ओसामा बिन लादेनची आत्माच या मगरीत आहे. ज्या तुरळक गावकऱ्यांनी या मगरीला इतरांना हल्ला करताना पाहिले आणि जे जिवंत वाचले ते ओसामाच्या हल्ल्याचे आणि ओसामा मगरीचे वर्णन करताना थरथर कापतात. इतकी दहशत व्हिक्टोरिया सरोवराच्या आसपासच्या गावातील लोकांमध्ये आहे. जे लोक सरोवराकाठून गायब झालेले असतात क्वचित काही प्रसंगात त्यांच्या कवट्या किंवा शरीराचा एखादा अवयव नंतर मासेमारांना सापडतो किंवा सरोवराकाठी सापडतो आणि लोकांना खात्री पटते की ओसामाने आणखी एका माणसाला गिळंकृत केले आहे.

५० गावकरी आणि असा पकडला गेला ओसामा

ओसामा मगरीची भीती गावकऱ्यांमध्ये इतकी जबरदस्त प्रमाणात होती की त्याच्या आवाजानेच रात्रभर लोक जागे राहायचे. आपल्या जीविताच्या रक्षणसाठी ते परमेश्वराची प्रार्थना करत राहायचे. अखेर २००५ मध्ये ओसामाला पकडण्यात यश आले. जवळपास सात दिवसांपर्यत चाललेल्या या अभियानात ५० गावकऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ओसामा पकडला गेला. या गावकऱ्यांनी मगरीला जाळ्यात ओढण्यासाठी गायीचे तुकडे टाकले होते. अखेर ही मगर गावकऱ्यांच्या तावडीत सापडली. गावकऱ्यांनी त्यानंतर मगरीला मोठ्या दोरांच्या साहाय्याने बांधले आणि एका पिकअप गाडीत टाकले. अर्थात ही कहाणी इथेच संपली नाही. तर गावकऱ्यांची इच्छा त्या मगरीला तात्काळ ठार मारण्याचीच होती. मात्र युगांडामध्ये मगरीच्या हत्येला परवानगी नाही. अधिकाऱ्यांनी मगरीला ताब्यात घेतले आणि युगांडाच्या मगर प्रजनन केंद्रात पाठवून दिले. या विशालकाय मगरीपासून अशाच विशालकाय मगरी जन्माला येतील आणि त्यांच्या चामड्याची निर्यात इटली आणि दक्षिण कोरियात केली जाऊ शकेल असे त्यांना वाटले. कारण मगरीच्या चामड्याला या देशांमध्ये मोठी मागणी आहे. ओसामा प्रजनन केंद्रात आल्यानंतर तिथे पर्यटकांची गर्दी जमू लागली. या भागात अद्याप ५,००० पेक्षा जास्त मगरी आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी