Viral Video: आईच्या दरबारात अश्लील डान्स; महिलांनी विरोध केल्याने चिघळला वाद

Obscene Dance Viral Video । सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आईच्या दरबारात अश्लील डान्स केला जात आहे. या डान्सला महिलांनी जोरदार विरोध केला आहे, ज्याच्यानंतर एकच गोंधळ निर्माण झाला आहे.

Outrage of women against those who perform obscene dance in the temple of Goddess
आईच्या दरबारात अश्लील डान्स, महिलांच्या विरोधामुळे एकच खळबळ   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
  • व्हिडीओमध्ये आईच्या दरबारात अश्लील डान्स केला जात आहे.
  • हा व्हायरल व्हिडीओ मध्य प्रदेशातील मंदसौरमधील शामगढ येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.

Obscene Dance Viral Video । मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आईच्या दरबारात अश्लील डान्स केला जात आहे. या डान्सला महिलांनी जोरदार विरोध केला आहे, ज्याच्यानंतर एकच गोंधळ निर्माण झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मंचावरील फ्लेक्सवर 'माँ महिषासुर मर्दिनी देवी'चा मोठा फोटो लावला आहे. त्यामुळे लोकांचा रोष उसळला आणि कार्यक्रमाला विरोध करण्यात आला. त्याचबरोबर सीएमओच्या निलंबनाचीही मागणी करण्यात आली आहे. (Outrage of women against those who perform obscene dance in the temple of Goddess). 

अधिक वाचा : पुतीनच्या गर्लफ्रेंडने दिली गुड, पुतीनही आश्चर्यचकित

व्हायरल व्हिडीओ मध्यप्रदेशातील असल्याची चर्चा

दरम्यान, हा व्हायरल व्हिडीओ मध्य प्रदेशातील मंदसौरमधील शामगढ येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. 'माँ महिषासुर मर्दिनी देवी' या पशु मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पण या जत्रेत अश्लील गाण्यांवर नृत्य करण्यात आले. दरम्यान काही महिलांनी विरोध करत नृत्य थांबवले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता या व्हिडीओवरून राजकारणही तापले आहे. काँग्रेस पक्षानेही याला विरोध केला आहे. रुग्णालयाचे भूमिपूजन करण्यासाठी आलेले पर्यावरण मंत्री हरदीपसिंग डुंग यांच्यासमोरही याला विरोध करण्यात आला. मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

व्हिडीओ व्हायरल झाल्याने चिघळला वाद

माहितीनुसार, या ऑर्केस्ट्राचा ठेका सीतामऊ येथील भाजपशी संबंधित व्यक्तीचा होता. आता याप्रकरणी नगर परिषदेच्या दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. शहरी प्रशासन मंत्री भूपेंद्र सिंह यांनाही सीएमओ नासिर खान यांना निलंबित करण्यास सांगितले आहे. लक्षणीय बाब म्हणजे आता ही व्हिडीओ चर्चेचा विषय बनली आहे, त्यामुळे आरोपी आयोजकांवर कारवाई होणार का हे पाहण्याजोगे असेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी