Viral News : या देशात पेट्रोल डिझेल स्वस्त, पण कंडोमच्या किंमती टीव्ही फ्रिजपेक्षाही महाग

एका देशात पेट्रोल डिझेलची किंमत अवघी एक रुपये ७५ पैसे इतके आहे. परंतु या देशात कंडोमची किंमत हजारो रुपयांत आहे. या देशात एकवळे टीव्ही फ्रिज सारख्या वस्तूही स्वस्त वाटाव्यात इतक्या कंडोमच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. भारतासह जगात महागाई आहे. परंतु अनेक देशांत आरोग्य विभागाकडून कंडोम मोफतही दिले जातात. परंतु व्हेनेझुएला या देशात या कंडोमची किंमत हजारो रुपयांत आहे.

condom
कंडोम  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एका देशात पेट्रोल डिझेलची किंमत अवघी एक रुपये ७५ पैसे इतके आहे.
  • परंतु या देशात कंडोमची किंमत हजारो रुपयांत आहे.
  • नेक देशांत आरोग्य विभागाकडून कंडोम मोफतही दिले जातात.

Viral News : मुंबई :  एका देशात पेट्रोल डिझेलची किंमत अवघी एक रुपये ७५ पैसे इतके आहे. परंतु या देशात कंडोमची किंमत हजारो रुपयांत आहे. या देशात एकवळे टीव्ही फ्रिज सारख्या वस्तूही स्वस्त वाटाव्यात इतक्या कंडोमच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. भारतासह जगात महागाई आहे. परंतु अनेक देशांत आरोग्य विभागाकडून मोफतही दिले जातात. परंतु व्हेनेझुएला या देशात या कंडोमची किंमत हजारो रुपयांत आहे. असे का आहे जाणून घेऊया.

व्हेनेझुएला या देशात एका कंडोमच्या पाकिटाची किंमत ६० हजार रुपयांच्या घरात आहे. व्हेनेझुएलात एका कंडोम पाकिटाची किंमत सोन्यापेक्षाही महाग आहे. कारण भारतात एक तोळं सोन्याची किंमत ५३ हजार इतकी आहे. तर व्हेनेझुएलात एका कंडोमच्या पाकिटाची किंमत ६० हजार रुपये आहे. गेल्या काही दिवसांत या देशात कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्याची किंमत कमालीची वाढली आहे. याचे कारण या देशात एक कायदा पारित झाला आहे. त्यामुळे कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांना जास्तच महत्त्व प्राप्त झाले आहे.

खरंतर व्हेनेझुएलात गर्भपात करणे बेकायदेशीर केले आहे. कोणीही गर्भपात केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. व्हेनेझुएलात किशोरवयीन मुली गरोदर होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यात आता गर्भपात करण्यावर बंदी घातल्याने कंडोम आणि गर्भपाताच्या गोळ्यांना जास्तच महत्त्व निर्माण झाले आहे.

कंडोम आणि गोळ्यांसाठी खर्च हाताबाहेर

व्हेनेझुएलात आर्थिक संकट निर्माण झाले आहे. इथे लोकांचा अर्धा पगार फक्त कंडोम आणि गर्बनिरोधकाच्या गोळ्या घेण्यातच खर्च होत आहे. असे होत असताना दुसरीकडे सरकार या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असून कुठलेच धोरण आखत नाहिये. व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था जवळ जवळ कोलमडली आहे. इथले जीवनापयोगी वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.

पेट्रोल डिझेल सर्वाधिक स्वस्त

आपल्याकडे पेट्रोल डिझेल आणि एलपीजी गॅसच्या किंमती वाढल्या असताना व्हेनेझुएलात पेट्रोल डिझेल स्वस्त आहे. व्हेनेझुएलात पेट्रोल डिझेलची किंमत प्रतिलीटर एक रुपये ७५ पैसे इतकी आहे. GlobalPetrolPrice या वेबसाईटनुसार जगात सर्वाधिक स्वस्त पेट्रोल डिझेल इराण नंतर व्हेनेझुएला देशात आहे. कारण व्हेनेझुएला देशात पेट्रोल डिझेलच्या विहिरी आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी