Viral News Paithan maharashtra two girl fight on bus stand due to common boyfriend : एका मुलाच्या प्रेमात पडलेल्या दोन मुलींमध्ये एसटी स्टँडवर हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. व्हायरल झालेली घटना महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणमध्ये घडली. । व्हायरल झालं जी
जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते
विमान प्रवासादरम्यान चुकूनही करू नका 'या' गोष्टी, अन्यथा...
तुम्हीही डिजिटल पेमेंट करता? मग ही बातमी वाचाच....
मुलींमध्ये आधी शाब्दिक संघर्ष झाला. थोड्याच वेळात शाब्दिक संघर्षाचे रुपांतर शारीरिक संघर्षात झाले. दोन मुलींची हाणामारी सुरू झाल्याचे पाहून एसटी स्टँडवर उपस्थित असलेले अनेकजण चक्रावले. हाणामारी लवकर थांबत नसल्याचे पाहून अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मुलींची हाणामारी थांबली. हाणामारी करणाऱ्या दोन्ही मुली अल्पवयीन आहेत.
मुलींमध्ये मुलगा कोणावर प्रेम करतो या मुद्यावरून वाद आणि संघर्ष झाला. प्रत्येक मुलगी मुलावर आपला अधिकार सांगू लागली. यातून संघर्ष वाढला. याआधी दोन पैकी एका मुलीसोबत एके ठिकाणी जाण्यासाठी मुलगा एसटी स्टँडवर आला होता. दुसरी मुलगी त्याचवेळी एसटी स्टँडवर आली. तिने मला न घेता मुलगा दुसऱ्या कोणत्याही मुलीसोबत जाऊ शकत नाही अशा स्वरुपाचा दावा करत मुलासोबत आलेल्या मुलीशी वाद घालण्यास सुरुवात केली. शाब्दिक संघर्ष थोड्याच वेळात हाणामारी पर्यंत पोहोचला.
हाणामारी जोरात सुरू असल्याचे पाहून पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी हस्तक्षेप करून कशीबशी मारामारी थांबविली. रागाने धुमसत असलेल्या दोन्ही मुलींना पोलीस पथकाने ताब्यात घेतले. नंतर मुलींना पोलीस ठाण्यावर नेण्यात आले आणि त्याची चौकशी करण्यात आली.
सगळा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी दोन्ही मुलींना सज्जड दम दिला आणि पुन्हा हाणामारी करू नका अशी कडक शब्दांत समज दिली.