Viral Video : भारताचा शेजारी असणाऱ्या पाकिस्तानमध्ये (Pakistan) दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. त्यातील काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही देशातील गंभीर परिस्थिती दाखवणारे असतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ म्हटलं तर मजेशीर आणि म्हटलं तर गंभीरही आहे. पाकिस्तानमध्ये सततच्या अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे कुठलं ना कुठलं आंदोलन होतच असतं. रोजच कुणी ना कुणी कार्यकर्ते कुठल्या ना कुठल्या पक्षाविरोधात रस्त्यावर उतरतात आणि आंदोलन करतात. या आंदोलनकर्त्यांचा विचार करून पाकिस्तानमधील एकाने फोटोंना चप्पल मारणारं यंत्र (Shoe hitting machine) तयार केलं आहे.
The start up ecosystem in Pakistan has truly come of age. This #AutomaticLaanatMachine is the latest invention from the land of the pure. pic.twitter.com/qarqf3PsSA — Major Gaurav Arya (Retd) (@majorgauravarya) August 18, 2022
पाकिस्तानमध्ये इम्रान खान सरकार गडगडल्यानंतर सत्तेवर आलेलं शाहबाज शरीफ सरकार लोकांना फारसं पचनी पडलेलं नाही. त्यामुळे या सरकारविरोधात सतत आंदोलनं सुरु असतात. त्यात सरकारमधील महत्त्वाच्या नेत्यांच्या प्रतिमा जाळणे, त्यांच्या प्रतिमांना जोडे मारणे यासारखे प्रकार सुरु असतात. फोटोंना जोेडे मारण्यासाठी अनेकदा आंदोलनकांना कष्ट पडतात. आयत्यावेळी चप्पल सापडत नाही. कुणाच्या तरी पायातील चप्पल आयत्यावेळी काढून आणावी लागते. ही समस्या सोडवण्यासाठी पाकिस्तानमधील एकाने अनोखं यंत्र तयार केलं आहे.
व्हिडिओत दिसणारं हे यंत्र स्वतःच फोटोतील चेहऱ्यांना चपलाने मारताना दिसतं. या यंत्रात तीन फोटो लावण्यात आले असून प्रत्येक फोटोला मारण्यासाठी एक-एक चप्पल बसवण्यात आलं आहे. एक व्यक्ती या मशीनची दोरी हाताने ओढते आणि सोडून देते. त्यानंतर आपोआप तीन चपला तीन वेगवेगळ्या चेहऱ्यांवर मारल्या जातात. एकामागून एक असे अनेकदा चप्पल मारले जातात.
अधिक वाचा - King Cobra Attack : कोब्राने केला लहान मुलावर हल्ला, पुढचं दृश्य पाहून बसेल शॉक, पाहा VIDEO
पाकिस्तानसह जगभरातील नागरिकांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशा प्रकारच्या यंत्राचा अविष्कार फक्त पाकिस्तानातच होऊ शकतो, असं मत एकाने व्यक्त केलं आहे. तर कोण म्हटतं की पाकिस्ताना टेक्नॉलॉजीमध्ये मागे आहे, असा सवाल एकाने केला आहे. पाकिस्तानची स्टार्ट-अप इंडस्ट्री गेल्या काही दिवसांपासून थंडावली असून या यंत्रामुळे पुन्हा एकदा त्याला चालना मिळेल, असा विश्वासही काहीजणांनी व्यक्त केला आहे.
अधिक वाचा - ...ती भेटायला आली अन् Kiss घेऊन गेली, पोलिसांनी पकडून टाकलं तुरुंगात
आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळे शोध लागल्याचं आपण पाहत असतो. नवनवे जुगाड करून माणसं आपलं आयुष्य अधिकाधिक सोपं बनवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यात गाडीबाबत केलेला जुगाड असो किंवा काही गोष्टी सोप्या आणि सोयीस्कर प्रकारे करण्यासाठी लावलेली शक्कल असो. भारतातही अनेक जुगाडु लोक आपल्याला भेटतात. आंदोलन करताना आंदोलकांची सोय व्हावी, या उद्दात्त हेतून तयार कऱण्यात आलेल्या या चपला मारणाऱ्या यंत्राचा सध्या पाकिस्तानमध्येच चांगलाच बोलबाला असल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.