Viral Video From Pakistan, पाकिस्तानचे मंत्री अहसान इकबाल यांना बघून नागरिक ओरडले चोर चोर

pakistan minister chor chor video, Pakistan federal Minister Ahsan Iqbal at McDonalds, people started chanting 'Chor Chor' see viral video : पाकिस्तानमध्ये कधी काय होईल याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. व्हायरल व्हिडीओत पागकिस्तानच्या मंत्र्याला बघून नागरिक चोर चोर असे ओरडताना दिसतात

pakistan minister chor chor video, Pakistan federal Minister Ahsan Iqbal at McDonalds, people started chanting 'Chor Chor' see viral video
Viral Video From Pakistan, पाकिस्तानचे मंत्री अहसान इकबाल यांना बघून नागरिक ओरडले चोर चोर  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानचा मंत्री बघून नागरिक ओरडले चोर चोर
  • लाहोरचा व्हिडीओ
  • व्हिडीओ झाला व्हायरल

pakistan minister chor chor video, Pakistan federal Minister Ahsan Iqbal at McDonalds, people started chanting 'Chor Chor' see viral video : पाकिस्तानमध्ये कधी काय होईल याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. निवडणूक जिंकून सत्ता स्थापन करणाऱ्या इमरान खान यांना हटवून विरोधकांनी पाकिस्तानमध्ये सत्ता स्थापन केली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरिफ यांचे भाऊ शहबाज शरिफ यांनी पाकिस्तानमध्ये नवे सरकार स्थापन केले आहे. शहबाज शरिफ पाकिस्तानचे पंतप्रधान झाले आहेत. पण इमरान खान समर्थक शांत बसलेले नाहीत. जमेल त्या पद्धतीने इमरान खान यांचे समर्थक शहबाज शरिफ आणि त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांना विरोध करत आहेत. 

सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाकिस्तानमधील आहे. व्हायरल व्हिडीओत पाकिस्तानमधील एक प्रतिष्ठीत रेस्टॉरंट दिसत आहे. या ठिकाणी शहबाज शरिफ सरकारमध्ये मंत्री असलेली व्यक्ती आल्याचे दिसते. पाकिस्तानचे मंत्री अहसान इकबाल रेस्टॉरंटमध्ये येताच काही जण मंत्र्याकडे बघून चोर चोर असे ओरडू लागतात. हा व्हिडीओ इमरान खान यांच्या समर्थकांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट केला आणि थोड्याच वेळात तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार लाहोरमध्ये एका मोठ्या रस्त्याजवळ असलेल्या प्रतिष्ठित रेस्टॉरंटमध्ये पाकिस्तानचे मंत्री अहसान इकबाल गेले होते. तिथे मंत्र्याकडे बघून नागरिकांनी चोर चोर असे ओरडण्यास सुरुवात केली. 

व्हायरल व्हिडीओ संदर्भात काही मीडिया प्रतिनिधींनी पाकिस्तानचे मंत्री अहसान इकबाल यांच्याकडे चौकशी केली. मीडिया प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तर देताना अहसान इकबाल यांनी बदनामी करण्याच्या हेतूने काही जण मुद्दाम मला बघून ओरडत होते, असा आरोप केला. ओरडणारे प्रतिष्ठित कुटुंबातील असल्याचे सांगत होते पण त्यांचे वर्तन तसे वाटत नव्हते असेही अहसान इकबाल म्हणाले.

इमरान खान यांनी शहबाज शरिफ सरकार विरोधात आंदोलन सुरू केले आहे. शहबाज शरिफ सरकार चोर आहे, असा आरोप इमरान खान यांनी केला आहे. विदेशी कटाच्या मदतीने चोररस्त्याने सत्ता स्थापन करणारे शहबाज शरिफ सरकार हे चोर सरकार आहे; असा आरोप इमरान खान यांच्याकडून सातत्याने सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी