countries facing inflation : आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या या देशांत कुठे १० लाखाला एक टोमॅटो, तर १० हजाराला सिलेंडर

Inflation In Pakistan And Sri Lanka | संपूर्ण जगावर कोविड-१९ चे आलेले संकट आणि चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे काही देश संकटाच्या उंबरठ्यावर आले आहेत. आपल्या शेजारील देश पाकिस्तान आणि श्रीलंका हे देखील यापासून वाचले नाहीत. काही देशात सिलेंडरची किंमत १०,००० रुपयांच्या जवळ पोहोचली आहे, तर काही देशात मिरचीची किंमत ७१० रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

 pakistan sri lanka and venezuela these country are facing big problem of inflation
काही देशांत १० लाखात एक टोमॅटो, तर १० हजारात सिलेंडर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानातील एलपीजीच्या किमती पाहून लोक हैराण झाले आहेत.
  • सध्याची महागाई ही संपूर्ण जगाची समस्या असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी सांगितले.
  • श्रीलंकेत नोव्हेंबर २०२१ ते डिसेंबर २०२१ दरम्यान अन्नधान्य महागाई १५ टक्क्यांनी वाढली असून भाज्यांचे वाढलेले भाव हे त्याचे प्रमुख कारण आहे.

Inflation In Pakistan And Sri Lanka | नवी दिल्ली : संपूर्ण जगावर कोविड-१९ (Covid-19) चे आलेले संकट आणि चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे काही देश संकटाच्या उंबरठ्यावर आले आहेत. आपल्या शेजारील देश पाकिस्तान आणि श्रीलंका ( Pakistan And Sri Lanka) हे देखील यापासून वाचले नाहीत. काही देशात सिलेंडरची किंमत १०,००० रुपयांच्या जवळ पोहोचली आहे, तर काही देशात मिरचीची किंमत ७१० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे जगभरातील काही देश आणि तेथील जनता महागाईने त्रस्त झाली आहे. (pakistan sri lanka and venezuela these country are facing big problem of inflation).  

पाकिस्तानच्या पंतप्रधानांची उडाली झोप

पाकिस्तानातील एलपीजीच्या किमती पाहून लोक हैराण झाले आहेत. देशात घरगुती सिलेंडरची किंमत २,५६० रुपयांवर पोहोचली आहे. तर व्यावसायिक सिलेंडरची किंमत ९,८४७ रुपये झाली आहे. एका अहवालाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये दुधाची किंमत एका लीटरमागे १५० च्या घरात पोहचली आहे. पाकिस्तानमध्ये साखरेचे दर १०० रुपये किलोवर पोहोचले आहेत. तर गव्हाचे भाव किलोमागे ४० रुपयांवरून ७० रुपये किलो झाले आहेत. एवढेच नाही तर मटण, चिकन, डाळी इत्यादी वस्तूंचे भावही गगनाला भिडले आहेत. 

अधिक वाचा : इतिहास जो मिटवेल त्यांना देश मिटवेल - यशोमती ठाकूर

देशातील किंमतवाढीच्या या प्रमाणामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांना हे मान्य करावे लागले की त्यांचा देश खूप मोठ्या प्रमाणात महागाईचा सामना करत आहे. त्यांनी म्हटले की, देशात वस्तू आणि इंधनाच्या किमती झपाट्याने वाढत आहेत आणि वाढत्या महागाईमुळे त्यांना झोप येत नाही. सध्याची महागाई ही संपूर्ण जगाची समस्या असल्याचे इमरान खान यांनी सांगितले. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी म्हटले की, जेव्हा त्यांच्या पक्षाने पाकिस्तानमध्ये सरकार स्थापन केले तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणावर खात्यातील तुटीचा सामना करावा लागला आणि त्यामुळे आयात महाग झाली. 

अधिक वाचा : या ऑस्ट्रेलियन फलंदाजाने मैदानावरच रचला इतिहास

कोरोनाने श्रीलंकेचे कंबरडे मोडले

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेवर घातक परिणाम झाला आहे. देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि रोजच्या वापरातील सामानाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. जागतिक बँकेचा अंदाज आहे की कोविड-१९ सुरू झाल्यापासून पाच लाख लोक दारिद्यरेषेखाली गेले आहेत. माहितीनुसार, श्रीलंकेत नोव्हेंबर २०२१ ते डिसेंबर २०२१ दरम्यान अन्नधान्य महागाई १५ टक्क्यांनी वाढली असून भाज्यांचे वाढलेले भाव हे त्याचे प्रमुख कारण आहे. श्रीलंकेत १०० ग्रॅम मिरचीची किंमत श्रीलंकेच्या रकमेनुसार १८ रुपये वरून ७१० रुपये झाली आहे. एवढेच नाही तर देशात एक किलो बटाट्याची किंमत २०० रुपयांवर पोहचली आहे. श्रीलंकेत वांग्याचा भाव १६० रुपये किलो, भेंडी २०० रुपये आणि गाजर २०० रुपये किलोवर पोहोचला आहे. 

अधिक वाचा : आयपीएल लिलावात जे आतापर्यंत नाही घडलं ते आता होणार

व्हेनेझुएलामध्ये देखील वाईट परिस्थिती 

दक्षिण अमेरिकन देश व्हेनेझुएलामध्ये (Venezuela) २०२१ मध्ये वार्षिक महागाई दर ६८६.४ टक्के होता. २०२० मध्ये देशातील महागाईचा दर २,९५९.८ टक्क्यांवर पोहोचला होता. त्यामुळे खाद्यपदार्थ खूप महाग झाले आणि लोक त्याविरोधात रस्त्यावर आले. २०१९ मध्ये  देशात ५ टोमॅटोची किंमत व्हेनेझुएलच्या चलनानुसार ५ लाख बोलिव्हरवर पोहोचली होती.

सीरियातही कमी नाही महागाई 

सीरियामध्ये इंधनाच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीमुळे भाज्या आणि फळांच्या किमती १५ टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. देशात अनुदानाशिवाय डिझेल १७०० सीरियन पौंडांवर पोहोचले आहे. त्याचप्रमाणे सबसिडीशिवाय ९० ऑक्टेन गॅसोलीनची किंमत २५०० सीरियन पौंडांपर्यंत वाढली आहे. देशातील महागाईची परिस्थिती अशी झाली आहे की गेल्या वर्षी सीरियाने पाच हजार सीरियन पौंडांच्या नोटा जारी केल्या. तसेच आफ्रिकन देश सुदानमध्ये देखील महागाई शिगेला पोहोचली आहे. देशात साखर आणि गव्हाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तसेच येमेन आणि सीरियामध्ये खाण्यापिण्याचे सामान खूप महाग झाले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी