Viral Video: रिपोर्टिंग करताना महिला पत्रकाराने मुलाच्या कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हे इतके कॉमेडी असतात की झटपट व्हायरल होतात. असाच पाकिस्तानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.

pakistani reporter
पाकिस्तानी महिला रिपोर्टर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.
  • काही व्हिडीओ हे इतके कॉमेडी असतात की झटपट व्हायरल होतात.
  • असाच पाकिस्तानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हे इतके कॉमेडी असतात की झटपट व्हायरल होतात. असाच पाकिस्तानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. या व्हिडीओ मध्ये एक महिला पत्रकार वार्तांकन करत होती तेव्हा एक मुलगा मध्ये आला. तेव्हा ही महिला पत्रकार त्याच्यावर भडकली आणि त्याच्या कानशिलात लगावली. ही संपूर्ण घटना कॅमेर्‍यात कैद झाली आहे. आणि हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (Pakistani Journalist Slaps Boy During Live Reporting Video Goes Viral news in marathi)

पाकिस्तानच्या पत्रकारांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यात मग चांद नवाब, अमीन हफीज या पत्रकारांचा समावेश आहे. आता एका महिला पत्रकाराचा व्हिडीओ समोर आला आहे. बकरीदच्या दिवशी ही महिला पत्रकार लोकांमध्ये जाऊन वार्तांकन करत होती तेव्हा. एक मुलगा कॅमेरासमोर हात हलवत होता. तेव्हा ही महिला पत्रकार चिडली आणि त्याच्या जोरात कानाखाली लावली.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

ही संपूर्ण घटना कॅमेर्‍यात कैद झाली आहे. ट्विटरच्या '@ItxMeKarma' या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ५ लाखहून अधिक व्ह्युज मिळाले तर अडीच हजारहून अधिक युजर्सनी लाईक केला असून ४०० हून अधिक युजर्सहून शेअर केला आहे. इतकेच नाही तर कमेंट बॉक्समध्येही काही युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया कळवल्या आहेत.

असाच एक व्हिडीओ व्हायरल

एक पत्रकाराने लहान मुलाला मारण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी पाकिस्तानमध्ये एक व्यक्ती राजकीय सभेनंतर वार्तांकन करत होता. तेव्हा एक मुलगा कॅमेर्‍यात आला. तेव्हा या पत्रकाराने या मुलाला जोरात कानफटात मारली. ही घटनाही कॅमेर्‍यात कैद झाली आणि त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी