Parineeti Chopra And Raghav Chadha : 'त्या' भेटीचा Video येताच सोशल मीडियात #Ragneeti शब्द व्हायरल

parineeti chopra reacted on raghav chadha video social media users teased aap leader : मीडियाच्या कॅमेऱ्यांनी मागील काही दिवसांत अनेकदा बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे राघव चढ्ढा यांना एकत्र स्पॉट केले. हे व्हिडीओ प्रसिद्ध होऊ लागल्यापासून सोशल मीडियात चर्चेला उधाण आले आहे.

parineeti chopra reacted on raghav chadha
'त्या' भेटीचा Video येताच सोशल मीडियात #Ragneeti शब्द Viral  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • 'त्या' भेटीचा Video येताच सोशल मीडियात #Ragneeti शब्द Viral
  • राघव चढ्ढा यांच्या पोस्टवर परिणीतीने दिली कमेंट
  • एका युझरने सोशल मीडियाद्वारे राघव चढ्ढा आणि परिणीतीला लवकर लग्न करण्याचा सल्ला दिला

parineeti chopra reacted on raghav chadha video social media users teased aap leader : मीडियाच्या कॅमेऱ्यांनी मागील काही दिवसांत अनेकदा बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे राघव चढ्ढा यांना एकत्र स्पॉट केले. हे व्हिडीओ प्रसिद्ध होऊ लागल्यापासून सोशल मीडियात चर्चेला उधाण आले आहे. बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे राघव चढ्ढा रिलेशनशिपमध्ये आहेत, लवकरच दोघे लग्न करतील अशा स्वरुपाची चर्चा सोशल मीडियात सुरू आहे.

सोशल मीडियातल्या चर्चेला आणि मीडियातल्या बातम्यांना परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्याकडून अद्याप प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण आता सोशल मीडियातल्या चर्चेने जोर पकडला आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा एप्रिल-मे दरम्यान लग्न करतील अशी शक्यता सोशल मीडियातून व्यक्त होत आहे. 

राघव चढ्ढा यांनी अलिकडेच एक सार्वजनिक सभा घेतली. या सभेचे फोटो आणि व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. यापैकी एका पोस्टवर परिणीतीने कमेंट दिली. यानंतर सोशल मीडियातल्या चर्चेने नव्याने जोर पकडला. 

सोशल मीडिया एका युझरने राघव अधिक परिणीती बरोबर राघनिती असे पोस्ट केले. यानंतर Ragneeti हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. 

एका युझरने सोशल मीडियाद्वारे राघव चढ्ढा आणि परिणीतीला लवकर लग्न करण्याचा सल्ला दिला. दोघे एकत्र सुंदर दिसता, असेही संबंधित युझरने सांगितले. दुसऱ्या युझरने वहिनी आपलीच आहे असे सांगितले. तिसऱ्या युझरने राजनिती ते परिणीती हा प्रवास कसा केला असा प्रश्न राघव चढ्ढा यांना विचारला. तर चौथ्या युझरने सर्व काही परिणीतीसाठी होत आहे; अशा स्वरुपाचे मतप्रदर्शन केले. 

परिणीती आणि राघव एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात. दोघांच्या कुटुंबाचेही एकमेकांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. परिणीतीला राघवविषयी विचारले असता तिने मीडिया कॅमेऱ्यासमोर हसून उत्तर देणे टाळले. पण राघव चढ्ढा आणि परिणीती यांच्या भेटीगाठी अद्याप सुरू आहेत. रिपोर्टनुसार राघव चढ्ढा आणि परिणीती यांचा रोका झाला आहे. लवकरच साखरपुडा होणार आहे. 

लग्नाची चर्चा सुरू असली तरी परिणीती आणि राघव आपापली कामं आधीच निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार करत आहेत. परिणीती शूटिंगमध्ये तर राघव राजकीय कामांमध्ये बिझी आहे.

दर्दी परिणीति चोप्रा ,एक नाही अनेकवेळा तुटलंय दिल

सूर्या आणि ज्योतिकाने मुंबईत खरेदी केले 70 कोटींचे घर?

ब्युटीक्वीन सोफी चौधरी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी