गेल्या जन्मात दाबून ठेवलेला खजिन्यासाठी खोदला १५ फूट लांब सुरुंग 

 राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात जमिनीत गाडलेला खनिजा मिळविण्याचा मोहापायी एका तरुणाने १५ फूट लांब सुरुंग खोदला आहे. युवक सुरुंग खोदत शेजारच्या घरात गेला तेव्हा या सुरुंगाबाबत कळाले.

past life treasure man digging 15 fit tunnel in house rajastan viral news in marathi
गेल्या जन्मात दाबून ठेवलेला खजिन्यासाठी खोदला सुरूंग  |  फोटो सौजन्य: Representative Image

बुंदी :  राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात जमिनीत गाडलेला खनिजा मिळविण्याचा मोहापायी एका तरुणाने १५ फूट लांब सुरुंग खोदला आहे. या सुरुंगाबाबत तेव्हा माहिती पडले जेव्हा खजिन्याच्या शोधात सुरुंग खोदता खोदता युवक शेजारच्या घरात पोहचला. यानंतर शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली आणि सुरुंग खोदण्याचे काम बंद केले. 

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार हा युवक २ महिन्यांपासून चुपचाप हे काम करत होता. रविवारी शेजारी राहणाऱ्यांना आपल्या घराच्या खाली काही विचित्र आवाज ऐकायला आला. त्यानंतर जमिनीखाली काय आवाज येतो आहे याचा शोध घेतला. तेव्हा माहिती पडल्यावर सर्वजण हैराण झाले. 

सुरूंग खोदणारा व्यक्ती मंदबुद्धी असल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांनी जेव्हा याबाबत माहिती घेतली तेव्हा त्याने जी गोष्ट सांगितली तेव्हा पोलीसही त्याचे म्हणणे ऐकून चाट पडले. 

मीडिया रिपोर्टसनुसार या व्यक्तीने दावा केला की, त्याला त्याच्या मागील जन्माच्या वडिलांनी या खजिन्याबाबत माहिती दिली होती. या व्यक्तीचा दावा आहे की गेल्या जन्मात तो गुर्जर कुटुंबात जन्माला आला होता. त्या जन्मात त्याचे जे वडील होते, त्यांनी माझ्या स्वप्नात येऊन या ठिकाणी खजिना असल्याची माहिती दिली. त्यानंतर त्याने खोदकाम सुरू केले. 

हे खोदकाम गेल्या दोन महिन्यापासून सुरू होते. कोणाला लक्षात येणार नाही अशा पद्धतीने या व्यक्तीने खोदकाम केले. त्यानंतर त्याने आपल्या घरात इतका मोठा खड्डा केला, त्यानंतर सुरूंग खोदण्याचे काम सुरू केले. ते थेट शेजारी राहणाऱ्या घरात १५ फूट पर्यंत गेला.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी