गर्भवती हत्तिणीला खाऊ घातले फटाक्यांनी भरलेले अननस, बॉलिवूडची ही अभिनेत्री संतापली 

गर्भवती हत्तिणीला (Pregnant Elephant)लोकांनी फटाके असलेले अननस खाऊ घातले, त्यावर बॉलिवूडची अभिनेत्री श्रद्धा कपूर चांगली भडकली आहे. 

people fed pregnant elephant cracker filled pineapple shraddha kapoor reaction on it elephant died in kerala 2020, kerala elephant, pregnant elephant, kerala elephant incident, hooligan meaning, elephant killed in kerala, cracker laden pineapple, hooligan
गर्भवती हत्तिणीला खाऊ घातले फटाक्यांनी भरलेले अननस, बॉलिवूडची ही अभिनेत्री संतापली  

थोडं पण कामाचं

  • लोकांनी फटाके असलेले अननस खाऊ घातले
  •  बॉलिवूडची अभिनेत्री श्रद्धा कपूर चांगली भडकली
  • ट्वीटवर भडकली श्रद्धा कपूर 

नवी दिल्ली :  केरळमध्ये एका गर्भवती हत्तिणी (Pregnant Elephant)शी पशूंशी गैरवर्तणूकीचा सर्वात क्रूर प्रकार समोर आला आहे. यात काही दिवसांपूर्वी एका हत्तिणीला काही लोकांनी अननस खाऊ घातले. पण त्यात फटाके होते.  हत्तिणीला ते अननस तेथील स्थानिक नागरिकांनी खाऊ घातले होते. त्यानंतर या गर्भवती हत्तिणीच्या तोंडातच ते अननस फुटले. त्यामुळे त्या हत्तिणीच्या तोंडाला गंभीर जखम झाली. त्यानंतर जखमी इतकी गंभीर होती की त्यात तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अभिनेत्री श्रद्धा कपूर खूपच संतापली. असे करणाऱ्या त्या भावना शून्य लोकांच्या फटकारले आहे. 

अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor Twitter) ने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ' कसे कोणी असे करू शकते? काय लोकांकडे मन नाही आहे. माझे मन विखरून गेले आहे. आरोपींना कठोर दंड देण्याची आवश्यकता आहे. श्रद्धा कपूर यांनी ट्विट करून पेटा इंडिया (PETA India)  ही टॅग केले आहे. अभिनेत्रीच्या ट्विटवर लोक मोठ्या प्रमाणात ट्विट करत आहेत. उत्तर केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील एक वन अधिकाऱ्याने सोशल मीडियावर हत्तिणीच्या भयानक मृत्यूचे विवरण सांगितल्यानंतर ही घटना समोर आली आहे. 

ही हत्तिणी खाण्याच्या शोधात जंगलातून बाहेर एका गावाजवळ आली. ती गावातील रस्त्यावर फिरत होती. त्यावेळी काही लोकांनी फटाक्यांनी भरलेला अननस त्या हत्तिणीला खायला दिला. वन अधिकारी मोहन कृष्णन्न यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिले. की हत्तिणीने सर्वांना भरवसा केला. जेव्हा तिच्या तोंडात अननस फुटले तेव्हा ती घाबरली असेल. आपल्या पिल्लांबाबत विचार करत असेल. तिला जी १८ ते २० महिन्यांनंतर जन्म देणार होती. अननसमध्ये टाकलेले फटाके इतके खतरनाक होते की त्यामुळे तिची जीभ आणि तोंड गंभीर रित्या जखमी झाले. हत्तिणी गावात वेदना आणि भुकेने फिरत होती. आपल्या जखमेमुळे काही खाऊ शकत नव्हती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी