'या' देशात मास्क न घालणाऱ्याला भोगावी लागते भयंकर शिक्षा

people not wearing mask ordered to dig graves कोरोनाचे संकट वाढत असूनही काही महाभाग मास्क न घालता बेधडक सार्वजनिक ठिकाणी वावरत आहे. अशा मंडळींवर एका देशात कठोर कारवाई सुरू झाली आहे.

people not wearing mask ordered to dig graves
'या' देशात मास्क न घालणाऱ्याला भोगावी लागते भयंकर शिक्षा 

थोडं पण कामाचं

  • 'या' देशात मास्क न घालणाऱ्याला भोगावी लागते भयंकर शिक्षा
  • मास्क न घालणाऱ्याची रवानगी थेट स्मशानभूमीवर
  • शिक्षेमागचा हेतू साध्य होत आहे, संबंधित देशाच्या सरकारचा दावा

नवी दिल्ली: कोरोना संकटाची (corona crisis) तीव्रता वाढत आहे. जगात आतापर्यंत २ कोटी ९५ लाख ९४ हजार ५७३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी ७२ लाख ४६ हजार ४५० कोरोना रुग्णांवर (कोरोना अॅक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. महामारीचे संकट वाढत असूनही काही महाभाग मास्क न घालता बेधडक सार्वजनिक ठिकाणी वावरत आहे. अशा मंडळींवर एका देशात कठोर कारवाई सुरू झाली आहे. (people not wearing mask ordered to dig graves)

मास्क न घातल्यास कठोर शिक्षा देणारा देश

मास्कद्वारे (mask) नाक आणि तोंड झाकून घेणे तसेच सोशल डिस्टंस (social distance) राखणे या दोन नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या नियमांचे पालन केले नाही, मास्क घातले नाही तर संबंधित देशात कठोर शिक्षा दिली जात आहे. या देशाचे नाव आहे, इंडोनेशिया (Indonesia). 

मास्क न घालणाऱ्याची रवानगी थेट स्मशानभूमीवर

कोरोनावर मात करण्यासाठी इंडोनेशियात मास्क घालणे बंधनकारक आहे. या नियमाचे उल्लंघन केले तर मास्क न घालणाऱ्याची रवानगी थेट स्मशानभूमीवर केली जाते. तिथे मास्क घालून आणि सोशल डिस्टंस पाळून सरकारी अधिकाऱ्यांच्या देखरेखीत काम करावे लागते. मृतदेहांसाठी खड्डे खणणे, मृतदेह खड्ड्यात ठेवल्यानंतर ठरलेल्या पद्धतीप्रमाणे खड्डे बुजवणे ही कामं करावी लागतात.

कोरोना  संकट नियंत्रणात ठेवण्यासाठी मास्क न घालणाऱ्यांना कठोर शिक्षा

इंडोनेशियात आतापर्यंत २ लाख २५ हजार ३० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी ५५ हजार रुग्णांवर (corona patient) उपचार सुरू आहेत. देशातील १ लाख ६१ हजार ६५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. इंडोनेशियात कोरोनामुळे ८ हजार ९६५ मृत्यू झाले आहेत. पण कोरोनाची तीव्रता वाढू नये म्हणून इंडोनेशियाने मास्क घालणे बंधनकारक केले आहे. मास्क न घालणाऱ्या त्याच्या परिसराजवळच्या स्मशानभूमीवर पाठवले जाते. तिथे मास्क घालून आणि सोशल डिस्टंस पाळून सरकारी अधिकाऱ्यांच्या देखरेखीत मृतदेहांसाठी खड्डे खणणे, मृतदेह खड्ड्यात ठेवल्यानंतर ठरलेल्या पद्धतीप्रमाणे खड्डे बुजवणे ही कामं करावी लागतात.

शिक्षेचा हेतू साध्य होत आहे, सरकारचा दावा

कोविड प्रोटोकॉलचे (covid protocol) उल्लंघन करणाऱ्या, मास्क न घालणाऱ्या व्यक्तीला एवढी कठोर शिक्षा देणारा इंडोनेशिया हा जगातला पहिला देश आहे. पण स्मशानभूमीवर काम करावे लागू नये यासाठी मास्क घालण्याला प्राधान्य देण्यास सुरुवात झाली आहे. शिक्षेमागचा हेतू साध्य होत असल्याचे इंडोनेशिया सरकारने सांगितले. नागरिकांनी कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले तर कोरोना संकटावर लवकर मात करणे शक्य होईल, असा विश्वास इंडोनेशिया सरकारने व्यक्त केला.

कोरोनावरील लशीचे प्रयोग

भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड (Bharat Biotech International Limited - BBIL), आयसीएमआर (Indian Council of Medical Research - ICMR), एनआयव्ही (National Institute of Virology - NIV) आणि भारताचे केंद्रीय आरोग्य मंत्रालय संयुक्तपणे कोव्हॅक्सिन विकसित करत आहेत. या लशीच्या प्रयोगासाठी केंद्रीय सशस्त्र बल मेडिकल कॉलेजमध्ये २० माकडांवर प्रयोग करण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाला. माकडांच्या शरीरात कोरोनावर मात करण्यासाठी अँटीबॉडीज तयार झाल्या. 

ऑक्सफर्ड विद्यापीठाची प्रयोगशाळा (Oxford University Lab), पुण्याची सीरम कंपनी (Serum Institute of India) आणि अॅस्ट्राझेंका (Astrazeneca) संयुक्तपणे तयार करत असलेल्या कोरोनावरील लशीचे स्थगित केलेले प्रयोगही पुन्हा सुरू होत आहेत. इंग्लंडमध्ये प्रयोगात सहभागी झालेल्या एका स्वयंसेवकाची तब्येत बिघडल्यामुळे प्रयोग स्थगित करण्यात आले. भारतात सुरू असलेले प्रयोगही डीसीजीआयने (Drugs Controller General of India - DCGI) स्थगित केले होते. मात्र इंग्लंडमधील प्रयोगांना पुन्हा सुरुवात होत असल्यामुळे लवकरच भारतातही स्थगित केलेले प्रयोग सुरू होण्याची शक्यता आहे. 

भारत बायोटेक आणि सीरमसह भारतातील सात कंपन्या कोरोनावर मात करण्यासाठी लस करण्याकरिता संशोधन करत आहेत. प्रत्येक संस्थेचे संशोधन वेगवेगळ्या टप्प्यावर असले तरी प्रगतीपथावर आहे. लस आल्यास संकटावर मात करणे आणखी सोपे होईल, अशी आशा आहे. ताज्या अहवालानुसार सीरम आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांचे प्रयोग यशस्वी झाल्यास या दोन्ही कंपन्या २०२१च्या पहिल्या तिमाहीत लस बाजारात आणण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी