मौके पे चौका ! लॉकडाऊनमध्ये पठ्ठ्याने मिळवल्या तब्बल 145 पदव्या,जाणून घ्या या व्यक्तीची रंजक कहाणी

Complete 145 Degrees in Lockdown देशासह जगात कोरोनाची तिसरी लाट (third wave of corona) आली आहे, यामुळे देशातील विविध राज्य सरकार (State Government) संसर्ग (Infection) रोखण्यासाठी नव-नवीन निर्बंध लादत आहेत. परंतु दिवसेंदिवस वाढणारी रुग्णांची संख्या चिंता वाढवत असून परत एकदा लॉकडाऊन (Lockdown) लागणार अशी चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे.

person who got 145 degrees in lockdown time , Read Full Story
पठ्ठ्याने लॉकडाऊनमध्ये घरी बसून मिळवल्या 145 पदव्या  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • तिरुअनंतपुरम (Thiruvananthapuram) येथील रहिवासी असलेल्या शफी विक्रमन (Shafi Vikraman) यांनी लॉकडाऊन दरम्यान सुमारे 16 देशांतील विविध विद्यापीठांमधून पदव्या घेतल्या.
  • अभ्यासक्रमांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी दिवसातील 20 तासांपेक्षा जास्त वेळ देत असतं.

Complete 145 Degrees in Lockdown : नवी दिल्ली : देशासह जगात कोरोनाची तिसरी लाट (third wave of corona) आली आहे, यामुळे देशातील विविध राज्य सरकार (State Government) संसर्ग (Infection) रोखण्यासाठी नव-नवीन निर्बंध लादत आहेत. परंतु दिवसेंदिवस वाढणारी रुग्णांची संख्या चिंता वाढवत असून परत एकदा लॉकडाऊन (Lockdown) लागणार अशी चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. लॉकडॉऊन लागण्याच्या विचाराने देशातील नागरिक चिंतेत पडली आहेत. जर लॉकडॉऊन लागला तर परत घरात बसून राहावे लागेल. हातातील रोजगार जाणार अशी चिंता अनेकांना सतावत आहे. दरम्यान देशात दोनदा लॉकडाऊन लागला आहे, त्या काळा अनेकजण घरात बसून राहत होते. घरात बसून काय करावे हे लोकांना कळत नसल्याने लॉकडाऊन खूप त्रासाचा वाटत आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांना मानसिक त्रास होतो, कारण दिवसभर घरी बसून काय करावे हेच समजत नाही.पण, केरळमधील एका व्यक्तीने लॉकडाऊनचा फायदा घेत असे काही केले आहे, त्यावर तुम्ही विश्वास करणार नाहीत. परंतु जेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीचे काम कळेल तेव्हा तुम्हीही त्यांचे कौतुक कराल. 

या व्यक्तीने वेळेचा सदुपयोग करत वेगवेगळ्या विद्यापीठातून तब्बल 145 पदव्या मिळवल्या आहेत. या गोष्टीचा दावा खुद्द त्यांनीच एनएआय या वृत्तसंस्थेशी बोलतना केला आहे. तिरुअनंतपुरम (Thiruvananthapuram) येथील रहिवासी असलेल्या शफी विक्रमन (Shafi Vikraman) यांनी दावा केला की कोविड-प्रेरित लॉकडाऊन दरम्यान त्यांनी सुमारे 16 देशांतील विविध विद्यापीठांमधून 145 हून अधिक पदवी प्रमाणपत्रे मिळविली आहेत. एएनआयशी बोलताना, विक्रमन म्हणाले की त्यांनी लॉकडाऊन दरम्यान ते सुरू केले आणि या अभ्यासक्रमांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी दिवसातील 20 तासांपेक्षा जास्त वेळ घालवला. ते म्हणाले, "लॉकडाऊन अशी परिस्थिती होती की लोक बाहेर पडू शकत नव्हते, मी त्या वेळेचा जास्तीत जास्त वापर केला."

आपला अनुभव कथन करताना, विक्रमन म्हणाला की, सुरुवातीच्या टप्प्यात मिळालेले काही अभ्यासक्रम खूप कठीण होते, पण एकामागून एक पूर्ण केल्यावर, त्याच्या लक्षात आले की पुढे जाण्याची ही एक चांगली संधी आहे.  त्यांनी स्पष्ट केले, "हे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी, एकतर तुम्ही शैक्षणिकदृष्ट्या हुशार किंवा पुरेसे हुशार असले पाहिजे, प्रत्येकजण ते करू शकत नाही." विक्रमन म्हणाला, "लोकांना या कोर्सेससाठी पैसेही द्यावे लागतील, पण मी नशीबवान आहे की मी कोणतीही किंमत मोजली नाही. जर ते विनामूल्य नसते, तर हे निश्चित आहे की मी हे कोर्स पूर्ण करू शकलो नसतो, कारण आम्ही इतकी मोठी फी भरू शकलो नसतो."


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी