बिकिनी घालून या, मिळवा मोफत पेट्रोल, पाहा पेट्रोल पंपाचे दृश्य 

व्हायरल झालं जी
Updated Nov 19, 2019 | 12:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

रशियामध्ये एका पेट्रोल पंपावर ग्राहकाने बिकिनी परिधान करून आल्यास मोफत पेट्रोलची अजबगजब ऑफऱ दिली आहे. त्यानंतर लोकांची लांबच्या लांब रांग लागली आहे. 

petrol pump offering free petrol to customers on coming in bikini viral news in marathi google newsstand
बिकिनी घालून या, मिळवा मोफत पेट्रोल, पाहा पेट्रोल पंपाचे दृश्य   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • रशियातील एका पेट्रोल पंपाने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दिली अनोखी ऑफर 
  • ग्राहक जर बिकिनी परिधान करून आल्यास त्यांना मोफत पेट्रोल मिळणार 
  • ऑफरनंतर पेट्रोल पंपावर बिकिनी परिधान करून महिला आणि पुरूष येत असून लांबच्या लांब रांग लागली आहे. 

नवी दिल्ली :  जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडत असताना वाढत्या इंधन दरामुळे लोक त्राही त्राही करत आहेत. अशात जर कोणी मोफत पेट्रोलची ऑफर करत असेल तर लोक त्या ऑफरला खूप आनंदाने स्वीकार करतील. रशियातील एका पेट्रोल पंपाची जगभरात चर्चा होत आहे. या ठिकाणी लोकांना मोफत पेट्रोलची एक अजबगजब ऑफर दिली आहे. दरम्यान, त्याच्या मागे एक विचित्र अट ठेवली आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण... 

ही प्रकार रशियात घटत आहे. येथील एका पेट्रोल पंपावर ग्राहकांना मोफत पेट्रोलची ऑफर दिली आहे. यासाठी त्यांना एक अट घालण्यात आली आहे. ग्राहकांना पेट्रोल पंपावर बिकिनी परिधान करून यायचे आहे. अटी स्पष्ट करण्यात आले आहे की महिला असो वा पुरूष त्यांना बिकिनी परिधान करून यायचे आहे, तरच त्यांना मोफत पेट्रोल मिळणार आहे. 

 

 

पेट्रोल पंपाच्या या ऑफरनंतर येथील चित्र पाहणे इंटरेस्टिंग आहे. महिला तर महिला पण पुरूषही मोफत पेट्रोल मिळविण्यासाठी रंगबेरंगी बिकिनी परिधान करून येत आहेत. त्यांची लांबच्या लांब रांग लागली आहे. रशियाच्या समारा येथील ओल्वी पेट्रोल पंपाच्या मालकाने विचार केला की ही ऑफर ऐकल्यावर केवळ याचा लाभ घेण्यासाठी महिलाच येतील पण मोफत पेट्रोलसाठी पुरूषांनीही बिकिनी परिधान केल्यावर त्याला विश्वास बसला नाही. 

ही घटना इतकी लोकप्रिय झाली की त्यानंतर बिकिनी ड्रेस ट्विटरवर ट्रेंड करू लागला. याचे अनेक फोटो सोशल मीडियावर झळकू लागले. त्यावर लोकांनी अनेक मजेदार कमेंट करायला सुरूवात केली. अनेक पुरूष बिकिनी आणि हाय हिल्स घालून पेट्रोल पंपावर आले होते. यावेळी एका पुरूषाने हैराण करणारं वक्तव्य केले. तो म्हणाला, मोफत पेट्रोल मिळत असेल तर तो त्याचे सर्व कपडेही काढायला तयार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी